पुणे - सहाव्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगला अाता चांगलाच रंग चढला अाहे. चुरशीच्या चढाया अाणि सरस पकडीच्या अाधारे सामन्यागणिक थरार वाढत अाहे. यातच अाता तेलगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने विक्रमाला गवसणी घातली. अापल्यातल्या प्रतिभेच्या बळावर त्याने त प्रो कबड्डीमध्ये ७०० रेड पॉइंट्सची कमाई केली.
त्याने लीगच्या अातापर्यंतच्या ८४ सामन्यातून हा पल्ला यशस्वीपणे गाठला अाहे. अशी कामगिरी करणारा ताे एकमेव कबड्डीपटू ठरला आहे. त्याने हा पल्ला मंुम्बाविरुद्ध सामन्यातून गाठला. यामुळे त्याच्या नावे अाता या विक्रमाची नाेंद झाली. याशिवाय प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment