0
सोमरसेट - ब्रिटनमध्‍ये एका 70 वर्षीय व्‍यक्‍तीला 8 घटस्‍फोटानंतर अखेर प्रेम मिळाले आहे. तेही आपल्‍यापेक्षा वयाने 38 वर्षे लहान असणा-या तरूणीत. मागील 6 महिन्‍यांपासून ते एकमेकांना डेट करत होते. त्‍यांच्‍या एका कॉमन मित्रांद्वारे त्‍यांची भेट झाली होती.

लग्‍नासाठी प्रपोज करण्‍याची तयारी
- सोमरसेट येथे राहणारे 70 वर्षीय रोन शेफर्ड हे 32 वर्षीय नीना यांना पुढील आठवड्यात लग्‍नासाठी प्रपोज करणार आहेत. यासाठी त्‍यांनी तयारीही सुरू केली आहे. नीना या दोहा येथे राहतात. नीना यांच्‍या पतीचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यांना एक मुलगा आहे.
- रोन यांचे हे 9वे प्रपोजल असणार आहे. याविषयी रोन यांनी सांगितले आहे की, प्रपोजलचे संकेत आपण नीनाला यापूर्वीच दिले आहे आणि तीदेखील सर्व गोष्‍टींसाठी तयार आहे.
- रोन यांचे आतापर्यंत 8 विवाह झाले आहेत. त्‍यातील एकीसोबत त्‍यांनी सर्वाधिक म्‍हणजे 13 वर्षे संसार केला होता. तर एकीसोबत ते केवळ 10 महिने राहिले.
19व्‍या वर्षी केला पहिला विवाह
- रोन यांनी 1966मध्‍ये वयाच्‍या केवळ 19व्‍या वर्षी पहिला विवाह केला. प्रथम पत्‍नी मार्ग्रेट यांच्‍यापासून त्‍यांना 3 मुले झाले आहेत. मात्र दोन वर्षानंतरच ते विभक्‍त झाले.
- त्‍यांचा आठवा विवाह 11 वर्षे टिकला. 2015मध्‍ये त्‍यांनी घटस्‍फोट घेतला. मागील वर्षीही त्‍यांनी एका मुलीला लग्‍नासाठी प्रपोज केले होते. मुलीनेही त्‍यांचे प्रपोजल स्‍वीकारले होते. मात्र त्‍यांनी तो निर्णय नंतर रद्द केला. त्‍यानंतर त्‍यांची नीना यांच्‍याशी भेट झाली.
- पार्टनरच्‍या वयाबद्दल रोन यांनी सांगितले आहे की, नीना 30 वर्षे लहान असल्‍याने काहीच फरक पडणार नाही. माझ्यासाठी वयातील हे अंतर उलट परफेक्‍ट आहे.

1966 मध्‍ये केला पहिला विवाह

  • Man finally met the love of his life after eight divorces

Post a Comment

 
Top