0
न्यूज डेस्क: मुंबईच्या हॉस्पिटलने फेब्रुवारी 2016 मध्ये एक रुग्णाच्या सामान्य आजाराला जीवघेणा आजार असल्याचे सांगितले. यामुळे मुंबईच्या उपभोक्त्याने हॉस्पिटल आणि स्कॅनिंग सेंटरवर 60 हजार रुपयांचा दंड लावला.


काय होते प्रकरण 
72 वर्षीय बच्चु राव यांना अल्सरचा आजार होता. ते हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा सांगण्यात आले की, त्यांना धमन्याचा गंभीर आजार आहे. यासोबतच ते म्हणाले की, या रुग्णाकडे फक्त 24 तास उरले आहेत. यानंतर रुग्णाचे नातेवाईक त्यांना दूस-या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांना समजले की, काही गंभीर आजार नाही. त्यांना पोटाचा अल्सर असल्याचे समोर आले. उपचारानंतर ते पुर्णपणे बरे झाले. यानंतर स्वतः वयस्कर व्यक्तीने त्यांना घाबरवल्यामुळे आणि त्यांच्या नातेवाईकांना खोटे बोलल्यामुळे हॉस्पिटल आणि स्कॅनिंग सेंटरची तक्रार ग्राहक मंचात केली. या केस दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी केस लढ
ली.

तुमच्यासोबतही असे झाले तर अशी करावी तक्रार 
जर ग्राहकाला एखाद्या विक्रेत्याविरुध्द तक्रार नोंदवायची असेल तर नॅशनल कंज्यूमर हेल्पलाइनची वेबसाइट http://nationalconsumerhelpline.in/ वर जावे लागेल. येथे वेबसाइच्या मुख्य पृष्ठावर तक्रार रिजस्ट्रेशन टॅबवर क्लिक करावे लागेल. तात्काळ पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला पर्याय दिसतील. पहिले तक्रार नोंदवा आणि नंतर त्याची माहिती पाहा. 
1. जर तक्रारदादाला नवीन तक्रार नोंदवायची असेल तर 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा. 
2. जर पहिलेच वेबसाइटवर तक्रार नोंदवली असेल तर 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा. 
3. यासोबतच जिल्ह्याच्या उपभोक्ता फॉर्मवर जाऊन लिखित तक्रारही केली जाऊ शकते.
या गोष्टींकडे ठेवा लक्ष 
तक्रार करण्यापुर्वी वेबसाइटवर तक्रा
रदाराला अकाउंट रजिस्टर करावे लागेल. रजिस्ट्रेशन टॅब या दोन्ही पर्यायांच्या स्क्रीनवर एकत्र असतो. तक्रार जमा करण्यासाठी तक्रारदाराला कोर्टात किरकोळ फिस भरावी लागेल.
तक्रार पत्रात काय लिहावे
तक्रार सविस्तर तथ्यांसोबत लिहावी. यामध्ये घटना मुद्देसुद लिहावी. उपभोक्त्यासोबत काय चुकीचे झाले, किती नुकसान झाले आणि तक्रार सिध्द व्हावी यासाठी पुर्ण पुरावे सोबत असावे.
कंपनी किंवा व्यापा-याविषयी डिटेल द्यावे
ज्याच्या विरुध्द तक्रार आहे त्यावर कंपनी/ व्यक्तीचे पुर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबरची माहिती द्यावी. यासोबतच साहित्य/सर्विस चे पक्के बिल, साहित्य/सर्विससोबत मिळाली गॅरंटीचे कागद, विक्रेत्याने धोका दिल्यामुळे उपभोक्त्याचे झालेल्या नुकसानाचे मूल्य, उपभोक्त्याला यामुळे झालेले मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसानाची सविस्तर माहिती पुरव्यासोबत द्यावी लागेल.
किंमत किती असल्यास तक्रार कुठे करावी 
हायकोर्ट अॅडवोकेट संजय मेहरा यांनी सांगितले की, 20 लाखांपर्यंतच्या प्रकरणात जिल्हा ग्राहक मंच, 1 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकरणात राज्य ग्राहक मंच आणि 1 कोटींपेक्षा जास्त मोठ्या प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक मंचात तक्रार केली जाऊ शकते. ग्राहक जर जिल्हा कार्यालयाच्या निर्णयाने संतुष्ट नसेल तर तो राज्यात आणि राज्यात संतुष्ट नसेल तर तो राष्ट्रीय ग्राहक मंचात निर्णय मागू शकतो. जिल्हा पातळीवर अजुन ऑनलाइन तक्रारीची व्यवस्था पुर्णपणे सुरु झालेली नाही. अशा वेळी तक्रार करण्यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ग्राहक कार्यालयात जाऊन तक्रार करावी लागेल.
Hospital said the man has 24 hours to live

Post a Comment

 
Top