- मुंबईः अभिनेत्री हेमा मालिनी यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 ऑक्टोबर 1948 अमंकुदी, तामिळनाडू येथे जन्मलेल्या हेमा यांनी 21 ऑगस्ट 1979 रोजी सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न थाटले होते. पण लग्नानंतर हेमा कधीही आपल्या सासरी म्हणजे धर्मेंद्र यांच्या घरी गेल्या नाहीत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? याचा खुलासा राम कमल मुखर्जी यांच्या 'हेमा मालिनी : बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत संसार थाटला, पण त्यांना कधीच त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर आणि चारही मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नव्हती. म्हणून त्यांनी कधीही धर्मेंद्र यांच्या घरी जाण्याचा विचारही केला नाही.
लग्नापूर्वी अनेकदा- हेमा यांनी मुलाखतीत सांगितले होते, "मी प्रकाश कौर यांच्याविषयी बोलत नाही, पण माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर आहे. माझ्या मुलीसुद्धा धरमजींच्या कुटुंबीयांचा सन्मान करतात. जगाला माझ्या आयुष्याविषयी बरंच काही जाणून घ्यायची इच्छा आहे. पण मी माझ्या आयुष्याविषयी काहीही सांगण्यास इच्छूक नाही."
हेमा यांच्या भावाच्या घरुन झाले होते लग्न...
- हेमा मालिनी यांचे लग्न त्यांच्या भावाच्या घरुन झाले होते. तामिळ रितीने हे त्यांचे लग्न झाले होते. धर्मेंद्र आणि हेमा तामिळ पद्धतीनेच लग्न करु इच्छित होते. 'हेमा मालिनी : बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, धर्मेंद्र यांचे वडील केवल कृष्ण सिंह देओल आणि हेमा आणि त्यांच्या फॅमिलीला पसंत करत होते. हेमा यांनी पुस्तकात सांगितल्यानुसार, "केवळ कृष्ण सिंह देओल माझ्या भाऊ आणि वडिलांना कायम चहासाठी भेटत होते. या भेटीत ते पंजा लढवत असतं. ते गमतीने त्यांना (हेमा यांचे भाऊ आणि वडील) यांना म्हणायचे की, 'तुन्ही लोक तुप आणि लोणी खा. या इडली आणि सांबाराने शक्ती येत नाही.' यानंतर सगळे पोटधरुन हसत असतं."
घरच्यांना न सांगता हेमा यांना भेटायला पोहोचल्या होत्या धर्मेंद्र यांच्याआई...- हेमा यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकात धर्मेंद्र यांच्या मातोश्री सतवंत कौर आणि हेमा यांच्या नात्याचा उल्लेख आहे. हेमा यांनी सांगितल्यानुसार, "धरमजी यांच्या आई सतवंत कौर खूप चांगल्या महिला होत्या. मला आठवतंय त्या एकदा मला भेटायला जुहूच्या एका डबिंग स्टुडिओत पोहोचल्या होत्या. त्यावेळी ईशा माझ्या पोटात होती. त्यांनी या भेटीविषयी घरी कुणालाही सांगितले नव्हते. मी त्यांच्या पाया पडले आणि त्या म्हणाल्या, 'बेटा कायम आनंदी राहा.' हे बघून मला खूप आनंद झाला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment