0
 • India has the chance to win 6 series consecutive home matchesतिरुअनंतपुरम - गत सामन्यातील विजयाने यजमान भारतीय संघ जबरदस्त फाॅर्मात अाला अाहे. त्यामुळे अाता हीच लय कायम ठेवताना घरच्या मैदानावर सलग सहाव्या मालिका विजयाचा पराक्रम गाजण्यासाठी टीम इंडिया सज्ज अाहे. भारत अाणि विंडीज यांच्यात उद्या गुरुवारी मालिकेतील शेवटचा अाणि पाचवा वनडे सामना रंगणार अाहे. या सामन्यातील विजयाने टीम इंडियाला घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध सलग दुसरी मालिका जिंकण्याची संधी अाहे. याशिवाय भारताचा हा हाेमग्राऊंडवरचा सलग सहावा मालिका विजय ठरेल. 
  अाता भारताने घरच्या मैदानावरील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-१ ने अाघाडी घेतली. त्यामुळे अाता टीमला मालिका विजयाची शेवटची संधी अाहे.


  विंडीजसाठी अाता निर्णायक लढत : चाैथ्या वनडेतील शानदार कामगिरीच्या बळावर यजमान भारताने माेठा विजय संपादन केला. यासह भारताने विंडीजविरुद्धच्या या वनडे मालिकेत अाघाडी घेतली. त्यामुळे अाता मालिकेतील शेवटचा अाणि पाचवा वनडे सामना अधिक रंगतदार हाेईल. पाहुण्या विंडीजसाठी हा सामना निर्णायक अाहे. यातील पराभवाने विंडीजला मालिका गमावावी लागेल. त्यामुळे अाता तिसऱ्या विजयासह ही मालिका अापल्या नावे करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यातील विजयाने भारताला घरच्या मैदानावर पाहुण्या विंडीजविरुद्धची सलग दुसरी मालिका जिंकण्याची माेठी संधी अाहे.
  भारताचा संघ दाखल; अाज करणार कसून सराव
  दुसऱ्या विजयाने अात्मविश्वास द्विगुणीत झालेला भारतीय संघ अाता तिसऱ्या विजयासह मालिका अापल्या नावे करण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी काेहलीच्या नेतृत्वात भारताचा संघ मंगळवारी तिरुंअनंतपुरम येथे दाखल झाला. येथील मैदानावर मालिकेतील पाचवा अाणि शेवटचा वनडे सामना रंगणार अाहे. तसेच विंडीज संघाचेही या ठिकाणी अागमन झाले. अाता दाेन्ही संघ अागामी सामन्याच्या तयारीसाठी अाज सराव करतील.
  शेवटच्या वनडेसाठी ३ काेटींची तिकीटविक्री 
  पाचव्या वनडेसाठी अाता चाहत्यांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली अाहे. त्यामुळेच केरळ क्रिकेट असाेसिएशनच्या तिरुअनंतपुरमचा हा सामना अधिकच चर्चेचा ठरला अाहे. या सामन्यासाठी तब्बल ३ काेटींची कमाई झाली. या सामन्यासाठी ३० हजार तिकिटांची विक्री झाली. या स्टेडियमची ४५ हजार अासनक्षमता अाहे. अाता दहा हजार तिकिटांचीही विक्री हाेईल, असा विश्वास केसीएला अाहे.
  अायसीसीची खलील अहमदला ताकीद 
  खलील अहमदला चाैथ्या वनडेतील गैरवर्तन चांगलेच महागात पडले. यामुळे त्याच्यावर अायसीसीने एका डिमेरिट गुणाची कारवाई केली. त्याने डावातील १४ व्या षटकांत सॅम्युअल्सला बाद केले. कॅरेबियन टीमचा खेळाडू पॅव्हेलियनमध्ये जात असताना खलील हा चिडून अाेरडला.

Post a Comment

 
Top