0
मुंबई. अर्जुन रामपालची आई ग्विन रामपाल यांचे वयाच्या 67 व्या वर्षी रविवारी सकाळी निधन झाले. संध्याकाळी न्यू वरळी मधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अर्जुनची आई दिर्घकाळापासून ब्रेस्ट कँसरचा सामना करत होती. यावेळी अंत्ययात्रेत एकही बॉलिवूड स्टार सहभागी झालेला दिसला नाही. पण त्याची कथित गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएला डेमेट्रिएडस या कठीण प्रसंगी त्याच्यासोबत दिसली. यावेळी अर्जुनची एक्स वाइफ मेहर जेसियाही दिसली. तिच्या दोन्ही मुली यावेळी उपस्थित होत्या. अर्जुनने अंत्ययात्रेस दिला खांदा - मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये अर्जुनच्या आईवर उपचार सुरु होते. रविवारी सकाळी हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन झाले. त्याचे पार्थिव दुपारी घरी आणण्यात आले. संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. - अर्जुनने अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. पण त्याच्या आईच्या अंत्ययात्रेत कोणताही मोठा स्टार दिसला नाही. या वेळी अर्जुनसोबत डायरेक्टर अभिषेक कपूर पत्नी बरोबर आले, अभिनेत्री किम शर्मा, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे दिसले. - 4 वर्षांपुर्वी ग्विन रामपाल यांना ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कँसर झाला होता. याच वर्षी अर्जुनने ट्विट करुन आपली आई कँसरच्या लढाईत जिंकले असे सांगितले होते. पण रविवारी त्यांचे निधन झाले.

Post a Comment

 
Top