0
उदयपूर - राजस्थानात झालेल्या भीषण अपघातानंतर लोकांच्या कृत्याने माणुसकीला काळिमा लावली आहे. येथे शनिवारीच (13 ऑक्टोबर) एका कार आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. यात 3 मुलांसह 5 शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला. त्याच कारमध्ये असलेला एक मुलगा जोरदार धडकेमुळे 60 फूट दूर फेकल्या गेल्या. तो गंभीर जखमी होता. बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. परंतु, गंभीर जखमी अवस्थेत तो चिमुकला कुणीतरी आपली मदत करेल या अपेक्षेने सर्वांचे चेहरे पाहत होता. लोक आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात इतके गुंग झाले होते की कुणालाही त्या चिमुकल्याला उचलावेसे वाटले नाही. ही दुर्घटना उदयपूरपासून 50 किमी दूर जयसमंद-सलूंबर महामार्गावर शनिवारी सकाळी घडली. याच मुलासह इतर दोन शिक्षिकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


पिकनिकवर निघालेल्या चिमुकल्यांवर काळाचा घाला...
स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, डाया गाव येथील खासगी शाळेच्या 6 लेडी टीचर आणि 5 मुले उदयपूरच्या दिशेने पिकनिकसाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या कारला एका भरधाव ट्रकने धडक दिली. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये त्या मुलांच्या कारखाली फक्त आ

Post a Comment

 
Top