0
दतिया (एमपी) - 7 दिवसांपूर्वी घरातून मंदिराकडे चाललेल्या 20 वर्षीय तरुणीला तिघांनी किडनॅप करून गँगरेप केला. तरुणीने नराधमांना जीव तोडून विरोध केला, तेव्हा तिला बेदम मारहाण झाली. अख्खी रात्र गँगरेप केल्यानंतर नराधमांनी तिला रक्तबंबाळ अन् बेशुद्धावस्थेत मंदिराजवळच फेकून दिले. इकडे मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. पहाटे चार वाजता ती बेशुद्धावस्थेत आढळली, तेव्हा तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता.

नराधमांच्या भीतीने 6 दिवस घराबाहेर कुणीच निघाले नाही....
भावासोबत घरी पोहोचलेल्या तरुणीने पूर्ण घटना आपल्या आईवडिलांना सांगितली. कुटुंबीय त्या तरुणांच्या घरी जाब विचारायला गेले, तेव्हा त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. या धमकीच्या भीतीने कुटुंबीय 6 दिवस घराबाहेर निघालेच नाहीत. परंतु 7व्या दिवशी जेव्हा त्या नराधमांनी आणखी भीती घालण्यासाठी दारावर येऊन गोळीबार केला, तेव्हा पीडितेचे कुटुंबीयांनी डायल 100 ला फोन करून बोलावले आणि त्याच गाडीत मुलीला घेऊन पोलिस स्टेशनला गेले. येथे पीडितेने त्या रात्रीची पूर्ण घटना महिला पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिघांवर गँगरेपचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये एचडीएफसी बँकेचा एक कर्मचारीही सामील आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे.
आरोपीच्या घरच्यांनी धमकावले- गप्प राहा, नाहीतर कुणीच जिवंत राहणार नाही
25 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता पीडितेचा छोटा भाऊ पुन्हा मंदिरात गेला तेव्हा तरुणी बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता. कपडेही रक्ताने माखलेले होते. आईवडिलांनी विचारल्यानंतर तिने घडलेला प्रसंग सांगितला. सकाळ झाल्यावर पीडितेचे वडील आरोपी सोनू मिश्राचे वडील किशोरीलाल यांना भेटायला गेले. परंतु ते घरी नव्हते. मग त्यांचे भाऊ राकेश मिश्रा भेटले. पीडितेच्या वडिलांनी राकेश यांना आपल्या मुलीसोबत झालेल्या घटनेबद्दल सांगितले. तेव्हा राकेशने उलट त्यांनाच धमकी देत म्हटले की, पोलिस तक्रार करशील तर जिवंत राहणार नाहीस. आम्ही तुला आणि तुझ्या घरातल्या कुणालाच सोडणार नाही. दहशत आणि बदनामीच्या भीतीपोटी पीडितेच्या वडिलांनी 6 दिवस तक्रार नव्हती दिली.

तोंडात कापडाचा बोळा, पाशवी अत्याचार, लाथाबुक्क्यांनी मारहाण
20 वर्षीय तरुणी म्हणाली की, ती दररोज सारखीच 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी गावातील माता मंदिरात दर्शनासाठी चालली होती. ती मंदिरात पोहोचली तेव्हा गावातीलच प्रिन्स मिश्रा, सोनू मिश्रा आणि नीरज पांडे यांनी तिला उचलून बळजबरी बाइकवर बसवून दोन किमी दूर जंगलात नेले, तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ओरडू लागल्यावर आरोपींनी तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मध्यरात्रीनंतर आरोपींनी बाइकवर बसवून पुन्हा मंदिराजवळ नेऊन फेकले.
सातव्या दिवशी आरोपींनी केला गोळीबार, मग समोर आली घटना
गँगरेपच्या घटनेनंतर आरोपींनी पीडितेच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. भीतीमुळे पीडितेचे वडील तक्रार करायला गेले नव्हते. पण रविवारी सकाळी 8 वाजता पीडितेची आई पाणी आणण्यासाठी बाहेर आली, तेव्हा आरोपींनी त्यांची वाट अडवून अश्लील शिवीगाळ केली. यानंतर काही वेळानेच रोहित, प्रिन्स गावठी पिस्तूल घेऊन आले आणि त्यांच्या घरावर अंदाधुंदर गोळीबार केला. आरोपींनी धमकी दिली की, जर तक्रार दाखल केली तर जिवंत राहणार नाहीत. यावर पीडितेने घरातूनच पोलिसांना 100 नंबरवर कॉल केला. पोलिस घरी पोहोचले आणि पीडित कुटुंबाला पोलिस स्टेशनला नेऊन विचारपूस केली, तेव्हा ही घटना समोर आली. एक आरोपी सोनू एचडीएफसी बँकेचा कर्मचारी आहे.

भीती एवढी की पोलिसांसमोर थरथरत होता बाप, 6 दिवस घराबाहेर निघालेच नाहीत

  • Girl molestation and kidnapping case in datia

Post a comment

 
Top