नवादा (बिहार)- राजौली गाव पंचायतने एका तरुणीला अमानुष शिक्षा दिल्याचे समोर आले आहे. पीडितेचे शेजारच्या गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध आहे. दोघे लवकरच लग्नही करणार होते. परंतु तरुणीच्या नातेवाईकांनी या प्रेमविवाहाला विरोध केला. त्यामुळे पीडितेने 30 सप्टेंबरला प्रियकरासोबत पळून गेली होती.
पीडितेचे नातेवाईक तिल परत घरी घेऊन आले. तरुणीला गावात आणताच तिला पंचायतीसमोर तब्बल 5 पाच तास झाडाला बांधून ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तरुणी मदतीसाठी दयावया करत राहीली मात्र, तिची कोणाला किव आली नाही.
तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, गाव पंचायतीने तिला शिक्षा सुनावली आहे. शिक्षा तर तिला भोगावीच लागेल. या घटनेची माहिती अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचली नाही.
राजौली पोलिसांनी सांगितले की, या घटनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार मिळालेली नाही. तक्रार मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात
येईल.

Post a comment