0
 • date of assembly election in 5 states including MP, Rajasthan, Chhattisgarhनवी दिल्ली - पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत तारखा जाहीर करू शकते. आधी 12.30 ची वेळ देण्यात आली होती, पण नंतर निवडणूक आयोगाने 3 ची वेळ जाहीर केली. दरम्यान काँग्रेसने मोदींची सभा 1 वाजता असल्याने निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचा आरोप केला आहे.

  सध्या यापैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे. तेलंगणामध्ये टीआरएसने नुकतीच विधानसभा विसर्जित केली होती. ठरलेल्या वेळेआधी निवडणुका व्हाव्या अशी त्यांची इच्छा होती. त्याठिकाणी पुढील वर्षी निवडणूक होणार होती. तर मिझोरममध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

  मीडिया रिपोर्टनुसार सुत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले की, निवडणुकीची प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. छत्तीसगडच्या निवडणुका दोन टप्प्यांत आणि इतर राज्यांत एका टप्प्यांत निवडमुकी होण्याची शक्यता आहे. सर्व पक्षांनी त्या पार्श्वभूमीवर प्रचारही सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज अजमेरमध्ये रॅली आहे. तर कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुरैना आणि जबलपूरमध्ये तर भाजपाध्यक्ष अमित शाह उज्जैनमध्ये सभा घेणार आहेत.
  2013 ची स्थिती
  पक्षमध्यप्रदेशछत्तीसगडराजस्थान
  भाजप16549163
  काँग्रेस583921
  बसपा413
  इतर3113
  एकूण23090200
  सध्याचे सरकारभाजपभाजपभाजप
  लोकसभा निवडणूक 2014 ची स्थिती
  पक्षमध्यप्रदेशछत्तीसगडराजस्थान
  भाजप271025
  काँग्रेस210
  बसपा000
  एकूण291125
  सत्तेचे दावेदार
  मध्यप्रदेश : शिवराज सिंह चौहान, कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया
  छत्तीसगड : रमन सिंह, अजित जोगी, भूपेष बघेल, टीएस सिंहदेव
  राजस्थान : वसुंधरा राजे सिंधिया, अशोक गेहलोत, सचिन पायलट
  प्रत्येक ठिकाणी प्रचाराचे तीनच चेहरे : नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी

Post a comment

 
Top