0
 • मुंबई - इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन भारतात ई-कारचा वापर वाढावा अशी सरकारची याेजना अाहे. केंद्र व राज्य सरकार त्यासाठी अनुदान देते, रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कही माफ करते. अशा ई-कारना हिरवी नंबर प्लेट देण्याचा निर्णयही सरकारने घेतला अाहे. देशातील अशी हिरवी नंबर प्लेट असलेली पहिली ई-कार ठाण्यातील अविनाश निमोणकर यांनी घेतली आहे.

  निमोणकर यांनी सांगितले, पेट्रोल डिझेलमुळे प्रदुषण हाेते. पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा म्हणून केंद्र सरकारने २०३० पर्यंत देशातील सर्व गाड्या इलेक्ट्रिकवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गाड्यांसाठी हिरवी नंबर प्लेट असेल. महिंद्रा कंपनीने पहिली इलेक्ट्रिक सेडान कार ई-व्हेरिटो आणली असून पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून मी ही कार घेतली आहे. दसऱ्याला ही कार मी अाणली.
  ५० रुपयांत १५० किमी प्रवास : ही कार शून्य टक्के प्रदूषण करते आणि एसी फ्रिजसाठी आवश्यक असलेल्या १५ अॅम्पियरच्या प्लगद्वारे ८ ते १० तासांंत ही कार चार्ज होते. यासाठी साधारणतः ५० रुपये खर्च येतो आणि दीडशे किलोमीटरपर्यंत एका चार्जिंगमध्ये धावते. कारची किंमत साडेनऊ ते दहा लाख रुपये आहे. परंतु केंद्र सरकार १ लाख ३८ हजार आणि राज्य सरकार १ लाख रुपये अनुदान देते. तसेच यासाठी रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्क शून्य असल्याने सुमारे पाच लाख रुपयांची बचत होते. पेट्रोलची गाडी १० रुपये प्रती किमी अॅव्हरेज देते, तर इलेक्ट्रिक कार फक्त एक रुपयात एक किमी जाते. त्यामुळे पैशाची बचत होतेच, प्रदूषणालाही आळा बसतो. मी घरात चार्जिंग पॉइंट लावलेला आहे. तसेच बाहेरही सर्व डीलर्सकरडे व टाटा पॉवरनेही चार्जिंग पॉइंट सुरू केल्याने समस्या नाही, असेही निमोणकर म्हणाले.
  चार्जिंग पॉइंटसाठी बिनव्याजी कर्जनिमोणकर म्हणाले, मी आणि तीन-चार मित्रांनी राज्यातील ३३ हजार किमी महामार्गावरील प्रत्येक ५० किमीवर फास्ट चार्जिंग पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे ४५ मिनिटात कार चार्जिंग होईल. महामार्गांवर एकूण ६५० चार्जिंग पॉइंटची गरज आहे. फ्रँचाइझी तत्त्वावर हे काम केले जाणार असून एका चार्जिंग पॉइंटला १० लाख खर्च येईल. अार्थिकदृष्ट्या मागास तरुणांना सरकार त्यासाठी बिनव्याजी कर्ज देईल. २०० जणांनी नावे नोंदवली असून नोव्हेंबरअखेर मुंबई-नाशिक, पुणे, औरंगाबाद महामार्गांवर हे पाॅईंट असतील.
  ई-कारची वैशिष्ट्ये 
  ८-१० तासांत होते चार्जिंग 
  ५० रुपये एकदा चार्जिंगला खर्च 
  १५० किमीचा प्रवास एका चार्जिंगमध्ये हाेणे शक्य 
  १० लाखांपर्यंत किंमत 
  ५ लाखांपर्यंत सरकारी अनुदान
  The country's first 'Green Number Plate Car'

Post a Comment

 
Top