0
  • मुंबई - मुंबईच्या ट्रॉम्बेमध्ये शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात ते बालंबाल बचावले आहेत. परंतु, आमदारांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलिस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.


    हा जीवघेणा हल्ला शुक्रवारी रात्री मुंबईच्या ट्राम्बे परिसरात करण्यात आला. शिवसेना आमदार काते यांचा आरोप आहे की, गतरात्री ते एका माता मंडळामध्ये दर्शनासा`ठी गेले होते. त्यादरम्यान काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

    आमदार तुकाराम यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान आमदाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. आमदार तुकाराम काते यांनी आरोप केला आहे की, या घटनेला MMRDA चे काही ठेकेदार जबाबदार आहेत.
    पोलिसांत 5 अज्ञातांविरुद्ध गुन्हा
    पोलिसांनी याप्रकरणी 5 अज्ञातांविरुद्ध भादंवि कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि आर्म्स अॅक्ट तसेच दंगा भडकावणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्ल्यासाठी वापरलेली तलवारदेखील हस्तगत केली आहे. सध्या, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.Shiv Sena MLA Tukaram Kate escapes unhurt in an attack by unidentified miscreants with a sword late last night

Post a Comment

 
Top