कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टनकोडोली या गावी रविवारी विठ्ठल बिरदेव मंदिरात ढोल-ताशांच्या गजरात भाविकांनी सुमारे ५० टन हळदीची उधळण केली. कोजागरी पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी पट्टनकोडोलीत जत्रा भरते. यंदा जत्रेत ७ लाखांपेक्षा जास्त भाविक आले होते. मंदिरी समितीचे सदस्य प्रकाश निहरे यांनी सांगितले की, येथे सुमारे १२०० वर्षांपासून सुरू असलेली भविष्यवाणीची परंपरा आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. ही भविष्यवाणी येथील पुजारी खेलोबा ऊर्फ फरांडेबाबा महाराज करतात.
फरांडेबाबा दसऱ्याच्या दिवशी सोलापूरच्या माडातापुका येथून पायी निघतात. सुमारे ५०० किलोमीटरचा पायी प्रवास करून पौर्णिमेच्या दिवशी ते पट्टनकोडोलीला पोहोचतात. पुढील वर्षी तरी राज्यात पाऊस व पीकपाणी चांगले राहील. मात्र, राजकारणात उलथापालथ होऊ शकते, अशी त्यांनी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment