0
 • नाशिक - अाजवरच्या सर्वच राजकीय पक्षांना मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांबाबत ठाेस निर्णय घेता अाला नाही. त्यामुळे मराठा समाजात असलेल्या असंताेषाला वाट करून देण्यासाठी अाता नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.


  या पक्षाची अधिकृत घाेषणा दिवाळीच्या पाडव्याला पुणे जिल्ह्यातील भाेर तालुक्यातील रायरेश्वर मंदिरात करण्यात येणार अाहे. तसेच नव्या पक्षाच्या वतीने पाच लाेकसभा मतदारसंघात अाणि ५० विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यात येईल. समविचारी पक्षांबराेबर अाघाडीचाही विचार करू, असे पाटील म्हणाले.

  सुरुवातीला मुख्य संघटक, काेअर कमिटी अाणि जिल्हानिहाय १० पदाधिकाऱ्यांच्या निवडी होईल. पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत हाेणार असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली. या पत्रकार परिषदेस प्रा. चंद्रकांत भराट, विलास सावंत, अविनाश पवार, रणजित बाबर, परेश भाेसले, गणेश जगताप, चंद्रकांत सावंत, अॅड. कृष्णा सूर्यवंशी उपस्थित हाेते.
  राष्ट्रवादी, भाजपसह काेणत्याही पक्षाचा संबंध नाही 
  उदयनराजे भाेसले हे अामचे मार्गदर्शक असले तरी अामच्या नव्या पक्षाचा राष्ट्रवादीशी संबंध नसेल. भाजपच्या काही नेत्यांशी अामचे संबंध अाहेत म्हणून अाम्ही भाजपच्या इशाऱ्यावर पक्ष काढत नाहीत, असेही नाही. स्वतंत्र पक्ष काढल्यामुळे मराठा समाजाच्या मतांमध्ये विभाजन हाेणार नाही. तसेच धनगर, माळी यासह अन्य समाज बांधवांना बराेबर घेऊन निवडणुकीला सामाे
  New party for Marathas; Five Lok Sabha seats, 50 seats in the Legislative Assembly
 • रे जाणार अाहाेत, असेही सुरेश पाटील यांनी सांगितले

Post a Comment

 
Top