0
 • युटिलिटी डेस्क - दिवाळीच्या पूर्वी मोदी सरकारने 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारने जनरल प्रोव्हीडंट फंड (जीपीएफ) वरील व्याज दर 7.6% हून वाढवून 8% केला आहे. त्यातून 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होईल. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी ही वाढ करण्यात आली आहे. नवे व्याजदर 1 ऑक्टोबरपासून लागू होईल.


  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतो हा फंड 
  जीपीएफचे नवे दर केंद्रीय कर्मचारी, रेल्वे आणि डिफेन्स कर्मचाऱ्यांसाठी लागू असतील. जीपीएफ खाते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असते. त्यांच्या वेतनाचा एक ठरावीक भाग. या खात्यात जमा होतो. निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना जीपीएफ खात्यातील रक्कम मिळते. त्यावर टॅक्स लागत नाही.

  इतर छोट्या योजनांचे व्याजदरही वाढवले 
  सरकारने गेल्या महिन्यात पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी सारख्या छोट्या बचत योजनांवरही व्याजदरांत 0.40% वाढ केली होती. त्या वाढीनंतर सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 8.5% आणि पीपीएफ पर 8% एवढे केले होते. वाढीव व्याजदर 1 ऑक्टोबरपासून लागू असतील.

  सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 8.5% आणि पीपीएफ पर 8% एवढे केले होते. वाढीव व्याजदर 1 ऑक्टोबरपासून लागू असतील.

  • Diwali Gift For Government Employees

Post a Comment

 
Top