0
 • पत्तनमतिट्टा - केरळच्या 800 वर्षे जुन्या शबरीमाला मंदिरात 10 वर्षांच्या मुलींपासून ते 50 वर्षांच्या महिलांच्या प्रवेशासंदर्भात वाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्यास सांगितले आहे. पण स्थानिक लोकांना ते मान्य नाही. शुक्रवारी दोन महिला मंदिर प्रवेशाचा इतिहास रचणार होत्या. पण आंदोलकांनी त्यांना 500 मीटरवरच अडवल्याने ते शक्य झाले नाही. या दोघींना 150 जवानांच्या सुरक्षेच्या कड्यात आणि पोलिस महानिरीक्षकांच्या नेतृत्वात हेल्मेट परिधान करून मंदिरात नेले जात होते. पण प्रचंड विरोधामुळे त्यांना परतावे लागले.


  पोलिस म्हणाले, वाद-हिंसा नको 
  या दोन महिला म्हणजे हैदराबादच्या एक पत्रकार कविता जक्कल आणि दुसऱ्या कोच्चीच्या सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा आहेत. केरळचे पोलिस महानिरीक्षक श्रीजीत म्हणाले की, पोलिसांना याठिकाणी कोणताही गोंधळ होऊ द्यायचा नाही. विशेषतः भाविकांबरोबर वाद नको आहे. पोलिस फक्त कायद्याचे पालन करत आहेत. आम्ही दोन महिलांना दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. पण पुजाऱ्यांनी मंदिरात प्रवेश देण्यास नकार दिला. मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला तर मंदिर बंद करू असे ते म्हणाले. 
  पुजारी म्हणाले, मंदिराला कुलूप लावू 
  शबरीमाला मंदिराचे मुख्य पुजारी कंडारू राजीवारू म्हणाले की, जर महिलांनी बळजबरी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मंदिराला कुलूप लावून किल्ली त्यांच्या ताब्यात देऊ. आम्ही भाविकांच्या पाठिशी आहोत. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

  भाविक नव्हे इतर करताहेत विरोध महिलांचा आरोप 
  रेहाना म्हणाल्या, आम्हाला भाविक विरोध करत नसून इतर लोक अशांतता पसवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाविक असण्याची अट काय आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्याचे आम्ही आभार मानतो. आम्हाला इथे आल्याचा अभिमान आहे. कारण आजुबाजुची स्थिती भयावह आहे. रेहाना यांच्या कोच्चीतील घरी काही लोकांनी तोडपोड करत सामान बाहेर फेकले आहे.

  800 वर्षांची परंपरा 
  सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला शबरीमाला मंदिरात सर्व वयातील महिलांना प्रवेशाची परवानगी दिली होती. येथे 10 ते 50 वयाच्या मुली आणि महिलांना पवेश बंदी होती. 800 वर्षांपासून ही रुढी सुरू होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात केरलचे शाही कुटुंब आणि मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांसह अनेक हिंदु संघटनांनी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीस कोर्टाने नकार दिला होता. 12 व्या शतकातील या मंदिरात दरवर्षी 5 कोटीहून अधिक लोक दर्शनासाठी येतात.

Post a Comment

 
Top