0
 • 50 year old woman made dirty video with pensioner for blackmailing arrested in Haryanaकरनाल - हरियाणात राहणाऱ्या 62 वर्षांच्या एका वृद्धासोबत जे घडले त्याचा त्याने कधी विचारही केला नसेल. उतारवयात असलेल्या या वृद्धाची एका 50 वर्षीय महिलेशी मैत्री झाली. दोघांचे संपर्क वाढत गेले आणि प्रेम फुलले. यानंतर महिलेने त्या वृद्धाला असे अडकवले की त्याने कधी विचारही केला नव्हता.
  Advertisement


  एकाच कॉलोनीत राहायला आली होती महिला...
  करनाल शहरात राहणाऱ्या एक वयोवृद्ध माणूस 50 वर्षांची महिला जीतो हिच्या संपर्कात आला होता. दोघांमध्ये मैत्री इतकी वाढली की रोज मोबाईलवर एकमेकांशी बोलत होते. यानंतर महिलेने त्या माणसाच्या कॉलनीतच भाड्याचे घर घेतले आणि तेथे राहायला सुरुवात केली. काही दिवसांतच महिलेने वृद्धाच्या एकटेपणाचा गैरफायदा घेण्यासाठी एक मोठा षडयंत्र रचला.

  एक दिवस फोन करून म्हणाली, मनोरंजन करायचे असेल तर ये...
  काही दिवसांतच जीतोने त्या व्यक्तीशी अश्लील संवाद सुरू केले. तसेच शरीरसुखाचे अमीष देऊन त्याला एका गावात बोलावून घेतले. आपल्या मनोरंजनासाठी पंजाबहून एक तरुणी (मन्नो) आली आहे असे तिने वृद्धाला सांगितले होते. त्या तरुणीची आणि वृद्धाची ज्या खोलीत भेट होणार होती त्या ठिकाणी आधीच कॅमेरा सेट केला. तसेच त्या तरुणीचे आणि वृद्धाच्या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ बनवला. हाच व्हिडिओ दाखवून जीतोने त्या वृद्धाला 5 लाख रुपयांची मागणी केली.

  असे पकडले...
  व्हिडिओ पाहताच त्या माणसाची भंबेरी उडाली. आपल्याकडे 5 लाख नाहीत तर केवळ 3 लाख रुपये आहेत असे तो म्हणाला. यावर महिला 3 लाखात तयारही झाली. महिलेच्या सांगण्यावरून आजोबा घरी गेला. परंतु, पैश्यांसोबत पोलिसांनाही घेऊन आला. जीतोने ज्या तरुणीला ब्लॅकमेलिंगसाठी आणले होते, ती जीतोची पंजाबमध्ये राहणारी एक नातेवाइक होती. 30 वर्षांची मन्नो एक विधवा होती. या दोघींनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांनी अशा प्रकारचे सापळे रचून किती जणांना अडकवले याचा तपास केला जात आहे........

Post a comment

 
Top