0
नवी दिल्ली - इंडियन अॅटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये हाय परफॉर्मन्स कारचे वेगाने विकसित केल्या जात आहेत. कार कंपन्या याचाही विचार करत आहेत की, सध्याच्या काळातील कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या कार अत्यंत माफक दरात उपलब्ध होतील. अशाच काही कार लवकरच मार्केटमध्ये लाँच होणार आहेत. त्यांच्या किमतीही कमी असतील आणि परफॉर्मन्सही चांगला असेल.


टाटा टिआगो JTP
टाटा ने टिआगो JTP अॅटो एक्सपो 2018 मध्ये सादर झाली होती. हे मॉडेल जेयम अॅटोमोटिव्ह्स आणि टाटाने मिळून डेव्हलप केली आहे. JTPचा अर्थ जेयम टाटा परफॉर्मन्स आहे. लाँच झाल्यानंतर टाटा टिआगो JTP भारतात विक्री होणारी सर्वात स्वस्त हॅचबॅक असेल. 6 लाखाच्या आसपास हिची किंमत असू शकते.

ही कार अपग्रेड करण्यात आली आहे. बोनटवर एअर इन्टेक, नवीन ब्लॅक ग्रिल, रीडिझाइन बंपर आणि ग्रिल पर JTPलोगो आहे. कारमध्ये 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड 3 सिलेंडर पेट्रोल इंजीन आहे. तेच नेक्सॉनमध्येही आहे. हे इंजीन 108 बीएचपी पॉवर आणि 150 एनएम टॉर्क डनरेट करेल. असे समजले जात आहे की, ही कार यावर्षी ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत लाँच होऊ शकते.
some upcoming affordable high performance cars launched soon in india

Post a Comment

 
Top