0
  • Diesel rates will be reduced by Rs 4, says Chief Minister Devendra Fadnavisनाशिक- शुक्रवारी डिझेलचे दर 2.50 रुपायांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर आता आणखी 4 रुपयांपर्यंत डिझेल दर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून इंधन दर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


    चार राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्क १.५० रु. कमी केले. तेल कंपन्यांनाही १ रुपये कमी करण्यास सांगितले. त्यामुळे इंधन दर अडीच रुपयांनी उतरला. यानंतर महाराष्ट्र वगळता भाजपशासित मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, काश्मीर, हिमाचल, हरियाणा, आसाम आणि उत्तराखंडने व्हॅट २.५० रुपयांनी कमी केला. त्यामुळे पेट्रोल ५ रुपयांपर्यंत स्वस्त झाले. यापूर्वी १३ ऑगस्टला दर कमी झाले तेव्हा पेट्रोल ९ पैसे व डिझेलचे दर ५ पैसे कमी

Post a comment

 
Top