मुंबई - लोकसभा निवडणुकीला दीड वर्ष वेळ असतानाच भाजपने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांचा अंतर्गत आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. सप्टेंबरमध्ये पूर्ण झालेल्या या आढाव्यात राज्यात भाजप स्वबळावर लढला तर गेल्या वेळेपेक्षा जास्त म्हणजे २५ जागा जिंकू शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शिवसेनेसोबत युती झाली तर ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वेळी भाजप-शिवसेना आणि स्वाभिमानी युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या.
लाेकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. मागच्या वेळी शिवसेनेसाेबत युती असताना भाजपने २३ जागी विजय मिळवला हाेता. अाता २०१९ ला अाणखी जास्त जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. मागील वेळेस शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या, तर २००९ मध्ये ११ जागा हाेत्या. दोन्ही वेळेला युती होती आणि शिवसेनेच्या खासदारांची संख्याही वाढली होती. मात्र आता शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे स्वबळावर अापणही लढलाे तर किती खासदार निवडून येऊ शकतात, याचा सर्व्हे भाजपने केला अाहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेबरोबर युतीस भाजप तयार आहे, तर दुसरीकडे राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेण्याचे कामही सुरू अाहे. सध्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांत केंद्राच्या योजना नीट राबवल्या का, खासदाराचे काम कसे आहे, कार्यकर्त्यांचे खासदाराबाबत मत काय, याबाबत सर्व्हेमधून माहिती घेण्यात अाली. जिथे भाजपचा खासदार नाही तिथे पक्षवाढीसाठी काय करता येईल, मागच्या वेळी तिथे किती मते मिळाली होती, संभाव्य उमेदवार कोण शकेल, उमेदवार आयात करायचा का आदी बाबींचाही विचार भाजपने सर्व्हेत केलेला अाहे.
सेनेचाही २५ जागांवर दावा
शिवसेनेनेही ४८ मतदारसंघांत अंतर्गत सर्व्हे सुरू केला.काही उमेदवारही निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. फक्त मुंबई व कोकणातील उमेदवारांची नावे अंतिम करण्याचे काम बाकी आहे. शिवसेना स्वबळावरच लढणार असून या वेळी २५ जागा जिंकू, असा विश्वास पक्षाला वाटताे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment