सोमवारी अाणंद येथील अमूल कंपनीत गैरगुजराती कामगारांवर जमावाने हल्ला केला, यात सात जखमी झाले. दुचाकीवर आलेल्या हल्लेखाेरांनी त्यांना राज्याबाहेर जाण्यासाठी धमकावले. राजस्थान, मध्य प्रदेशातील १५ कामगार या कंपनीत अाश्रयाला अाहेत.
या प्रकरणी पाेलिसांनी क्षत्रिय ठाकाेर सेनेच्या ९ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिहारी तरुणाने केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर झालेल्या उद्रेकाचे हे लाेण गुजरातच्या नऊ जिल्ह्यांमध्ये पाेहाेचले अाहे. साबरकांठा, महेसाना, अहमदाबाद (शहर), अहमदाबाद (ग्रामीण), अरावली, सुरेंद्रनगर, गांधीनगर, वडाेदरा व अाणंद या जिल्ह्यांतील परप्रांतीयांवर हल्ले झाले. हिंसाचाराच्या ५६ घटनांत अातापर्यंत पाेलिसांनी ४३१ लाेकांना अटक केली.
पंचमहाल येथील एक कामगार देवाशिषने सांगितले की, हल्ल्याच्या भीतीने अाम्ही कामावरही जाऊ शकत नाही. काही जणांना तर जंगलात झाेपावे लागत अाहे. दुसरीकडे, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबाबत साेशल मीडियावर अफवांचे पेव फुटले अाहे. परप्रांतीयांवर हल्ले वाढल्याने अातापर्यंत अाठ हजारांवर हिंदी भाषिक लाेकांनी गुजरातमधून काढता पाय घेतला अाहे.पाचशे कामगारांनी साेडली घरे : पंचमहाल जिल्ह्यातील कालाेल अाैद्याेगिक वसाहतीतील ४०० कामगारांनी घर साेडून पळ काढला. या भागातील पाच ते सहा काॅलन्यांत हे कामगार अनेक वर्षांपासून राहत हाेते. दुसरीकडे पाटण अाैद्याेगिक वसाहतीतील ८० लाेकांनी साेमवारी पळ काढला. थराद, डिसा, वडगाम, दियाेदर व पालनपूरमध्येही परप्रांतीयांनी पळ काढला.माेदींनाही वाराणसीत जायचंय : निरुपम
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पंतप्रधानांवर टीका केली. 'माेदींच्या राज्यात उत्तर प्रदेश, बिहारी, मध्य प्रदेशच्या लाेकांवर हल्ले हाेत अाहेत. मात्र माेदींनीही त्यांना वाराणसीत जायचे अाहे हे लक्षात ठेवावे. वाराणसीच्या लाेकांनीच त्यांना पंतप्रधान बनवलंय.' असे ते म्हणाले.यूपी- बिहारच्या मुख्यमंत्र्यांची विजय रुपाणी यांच्याशी चर्चा
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी लाेकांना शांततेचे अावाहन केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी अादित्यनाथ यांनीही रुपाणींशी फाेनवरून चर्चा करत अापल्या राज्यातील लाेकांच्या सुरक्षेची मागणी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment