- नागपूर - पांढरकवडा येथील हल्लेखोर ‘अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी १७ सप्टेंबर २०१८ रोजी वन विभागाने मोहीम सुरू केली. या मोहिमेला २७ आॅक्टोबर रोजी एक महिना ०७ दिवस म्हणजे ४० दिवस पूर्ण झाले. सुरुवातीला जुजबी स्तरावर असलेली मोहीम वाघिणीने घेतलेल्या बळींची संख्या वाढल्यावर व माध्यमांत प्रकरण गाजल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हाती घेतली. सध्या २७ वाहने माेहिमेत आॅन ड्यूटी आहेत. यात २ जिप्सी फक्त पेट्रोलवर चालणाऱ्या आहेत. ४० दिवसांत २७ वाहनांवर ७ लाख ११ हजार ८०२ रुपये ३० पैसे इंधनावर खर्च झाल्याची माहिती वनाधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.
सध्या मोहिमेवर असलेल्या २७ वाहनांमध्ये ०२ जिप्सी, ३ स्काॅर्पिओ, १ मोठी आणि १ लहान रेस्क्यू व्हॅन, वाघिणीला शिकार करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या वाहतुकीसाठी महिंद्राचे १ वाहन, १ ट्रॅक्टर, १ ट्रक तसेच वनाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. वाघिणीला ट्रँक्विलाइज करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची वाहतूक छोट्या रेस्क्यू व्हॅनमधून होते. वाघिणीने शिकारीसाठी जंगलाबाहेर येऊ नये म्हणून तिच्यासाठी घोडा, बैल, बकरी आदी प्राण्यांची वाहतूक एका व्हॅनमधून केली जाते. तर मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, पाणी तसेच अन्य साहित्य ट्रकमधून पाेहोचवण्यात येते.वन संरक्षकाच्या वाहनावर रोज ९ लिटर इंधन खर्च
वाघिणीला पकडण्यासाठी लावलेला बेस कॅम्प कंपार्टमेंट नं. १५० मध्ये राळेगाव तालुक्यातील सराटी येथे आहे. प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा सध्या पांढरकवडा येथे तळ ठोकून आहेत. पांढरकवडा ते राळेगाव बेसकॅम्प हे अंतर सुमारे ४५ किमी आहे. सकाळी एक आणि सायंकाळी एक अशा दिवसातून दोन फेऱ्या होतात. एका गाडीला एका फेरीसाठी सरासरी साडेचार लिटर इंधन लागते. त्यानुसार दोन फेऱ्यांसाठी किमान ९ लिटर इंधन लागते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment