- maharashtra express news
मुंबईः बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी रेखा हिचा उद्या वाढदिवस असून ती वयाची 64 वर्षे पूर्ण करणार आहे. 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास (आता चेन्नई) येथे तिचा जन्म झाला. 1966 मध्ये 'रेंगुला रत्नम' या तेलगू सिनेमात ती बालकलाकाराच्या रुपात झळकली होती. रेखाने आपल्या करिअरमध्ये 180 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. सिनेमा आणि एन्टरटेन्मेंड वर्ल्डमधील तिच्याशी निगडीत अनेक गोष्टी चाहत्यांना ठाऊक आहेत. मात्र तिच्या कुटुंबीयांविषयी कुणाला फारशी माहिती नाही. जाणून घेऊयात रेखाच्या कुटुंबीयांविषयी..
तामिळ स्टारची मुलगी आहे रेखा
रेखा ही तामिळ स्टार जेमिनी गणेशन यांची कन्या आहे. रेखाशिवाय जेमिनी यांना एकुण सात मुलेमुली (6 मुली आणि 1 मुलगा) आहे. त्यांची नावे विजया चामुंडेश्वरी, सतीश कुमार, राधा उस्मान सैयद, रेवती स्वामीनाथन, कमला सेल्वराज, नारायणी गणेश आणि जया श्रीधर अशी आहेत.
अविवाहित आईची मुलगी आहे रेखा
रेखाच्या मातोश्री पुष्पावल्ली या प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री होत्या. त्यांनी जेमिनी गणेशन यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. याच काळात दोघांचे अफेअर सुरु झाले. रेखा ही त्यांची अनौरस संतती आहे. रेखाच्या जन्माच्यावेळी जेमिनी गणेशन आणि पुष्पावल्ली यांचे लग्न झाले नव्हते. कित्येक वर्षे जेमिनी यांनी रेखाला आपली मुलगी असल्याचे मान्य केले नव्हते. काही वर्षांनी जेमिनी आणि पुष्पावल्ली यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांच्या दुस-या मुलीचा राधा उस्मान सैयदचा जन्म झाला. अर्थातच रेखाला एक सख्खी बहीण आहे.जेमिनी गणेशन यांचे चार स्त्रियांसोबत होते संबंध
जेमिनी गणेशन यांच्या आयुष्यात चार स्त्रिया आल्या होत्या. 1940 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी त्यांचे लग्न अलामेलूसोबत झाले होते. असे म्हटले जाते, की अलामेलू या त्यांच्या एकमेव कायदेशीररित्या पत्नी आहेत. त्यानंतर त्यांचे अभिनेत्री पुष्पावल्ली, सावित्री आणि जुलियाना यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. बातम्यांनुसार, जुलियाना त्यांच्यापेक्षा वयाने 36 वर्षे लहान होती. पहिली पत्नी अलामेलू यांच्यापासून जेमिनी यांना चार मुलगी झाल्या. रेवती, कमला, जयलक्ष्मी या तीन मुली डॉक्टर आहेत, तर नारायणी ही मुलगी पत्रकार आहे. पुष्पावल्ली यांच्यापासून त्यांना दोन मुली झाल्या, त्यापैकी रेखा ही अभिनेत्री आहेत, तर राधा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली. दुसरी पत्नी सावित्रीपासून जेमिनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी विजया चामुंडेश्वरी फिजिओथेरपिस्ट असून मुलगा सतीश कुमार परदेशात स्थायिक झाला आहे.
रेखाच्या लग्नावर सस्पेन्स..
1973 मध्ये रेखाचे अफेअर बॉलिवूड अभिनेता विनोद मेहरासोबत होते. असे म्हटले जाते, की दोघांनी लग्न केले होते. मात्र आजवर याचा खुलासा झालेला नाही. रेखाने एका मुलाखतीत लग्नाची बातमी अफवा असून विनोद मेहरा चांगला मित्र असल्याचे म्हटले होते. विनोद मेहराव्यतिरिक्त अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे रेखाचे अफेअर चांगलेच गाजले होते. 1990मध्ये रेखाने दिल्लीस्थित बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केले होते. मात्र फार काळ हे लग्न टिकले नाही. रेखा लंडनमध्ये असताना मुकेश अग्रवाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात, आपल्या मृत्यूस कुणासही जबाबदार धरु नये, असे त्यांनी लिहिले होते. रेखा आजही विवाहित स्त्रियांप्रमाणे भांगात कुंकू लावते. पण ती कुणाच्या नावाचे कुंकू लावते यामागचे रहस्य अद्याप उघड झालेले नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment