0
 • dowry death: woman called infertile and murdered by inlaws in araआरा (बिहार)- नवरा पत्नीच्या अंगावर उकळता चहा फेकत होता तर नणंद तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होती. लग्नानंतर अवघ्या 3 वर्षांतच विवाहितेच्या सासरच्या लोकांनी तिला ओढणीने फासवर लटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (ता.29) बिहारमधील आरा शहरात घडली. माहेपारा (22 वर्ष) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
  अशी फुटली प्रकरणाला वाचा..
  विवाहितेला सासरचे लोक फासावर लटकावत असल्याचे शेजारी राहाणार्‍या लोकांना समजले. त्यांनी विवाहितेच्या आजीला याबाबत माहिती दिली. लोकांनी दरवाजा ठोठावला असता आरोपी पसार झाले. नंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश करत फासावर लटकलेल्या विवाहितेला खाली उतरविण्यात आले. तिली तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
  आजीने सांगितले, माहेपारा हिला सासरचे लोक म्हणायचे निपुत्रिक..
  >
  माहेपारा हिचे सासरचे लोक तिचा छळ करत होते. निपुत्रिक म्हणून तिला हिणवत होते. नवरा, दीर, सासू, आणि नणंद हे सर्व तिच्याशी कायम भांडण करत होते. माहेरहून पैसे आण, असा दम देत होते, असा आरोपही करण्यात आला आहे.
  3 वर्षांपूर्वी झाले होते लग्न...
  नाजिरगंज भागात राहणारे मोहम्मद मरहूम चांद यांची कन्या माहेपारा हिचा विवाह 3 वर्षांपूर्वी अली हसन याच्याशी झाला होता. लग्नानंतर दोघांचा संसार दीड वर्षांपर्यंत व्यवस्थितरित्या चालला. परंतु त्यानंतर माहेपारा हिच्या सासरचे लोक हुंडा आणि पैशांची मागणी करु लागले. नवरा वारंवार मारहाण तिला बेदम मारहाण करत होता.
  आजीने सांगितले की, ती नातीला भेटायला जात होती. सोमवारी सकाळी नातीची हत्या झाल्याचे समजले. ती नातीच्या घरी धावतपळत गेली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर माहेपारा फासावर लटकवेली दिसली.

  नवरा अंगावर फेकत होता उकळता चहा, नणंद करायची छळ
  सासरचे लोक माहेपाराला कायम बेदम मारहाण करत होते. तीन वर्षे झाले तरी माहेपाराला मुल होत नव्हते. त्यामुळे तिला निपुत्रिक असेही हिणवले जात होते. माहेपारा हिच्या नवर्‍याने दोन दिवसांअगोदरच पैशांची मागणी केली होती. माहेराहून पैसे आणण्यास माहेपाराने स्पष्ट नकार दिला होता. त्यावरून तिच्या अंगावर नवर्‍याने उकळता चहा फेकला होता. तसेच तिला बेदम मारहाणही केली होती. अखेर सोमवारी सासरच्या लोकांनी तिची निर्घृण हत्या केली.
  नवरा, सासू आणि नणंद फरार
  >
  घटनेनंतर माहेपारा हिचा पती, सासू आणि नणंद फरार आहे. माहेपाराचे काका मोहम्मद मिआज खान यांनी दिलेल्या त‍क्रारीवरून अली (नवरा) , मोहम्मद छोटू (दीर), रोझी खातून (ननंद) आणि बुदी खातून (सासू) यांच्याविरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top