0
दमोह (सागर) - स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या आधी चितेवर ठेवलेल्या मृतदेहाची हालचाल दिसून आली. मृताच्या तोंडातून फेस निघताना पाहून तेथे उपस्थित प्रत्येकाची घाबरगुंडीच उडाली. सर्वांना ते जिवंत असल्याची जाणीव झाली तेव्हा तेथे ताबडतोब एकानंतर एक अशा 3 डॉक्टरांना बोलावून चेकअप करण्यात आले. 3 डॉक्टरांच्या चेकअपनंतर मृतदेह कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात आणला. तेथे ईसीजी करण्यात आली, परंतु खूप उशिरापर्यंत नाडी शोधल्यानंतर शेवटी मृत घोषित करण्यात आले. मृतदेह पुन्हा स्मशानात आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकांनी पाहिले की, मृताच्या तोंडातून फेस निघत आहे
वास्तविक, खजरी मोहल्ला सिव्हिल वॉ र्ड नंबर-10 मधील रहिवासी होमगार्ड सैनिक दयाशंकर जीवनलाल नायक (56) हे मागच्या 6 महिन्यांपासून आजारी होते. कुटुंबीयांच्या मते, मंगळवारी सकाळी 9.10 वाजता त्यांचा श्वास थांबला. दुपारी 2.30 वाजता अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाला हिरदेपुर स्मशानभूमीत नेण्यात आले. दयाशंकर यांचा मुलगा राहुलने सांगितले की, स्मशानभूमीत चिता अर्थीवर ठेवली तेव्हा लोकांनी पाहिले की, वडिलांच्या तोंडातून फेस निघत आहे.
अंत्यसंस्कारात सामील शेकडो लोकांनी पाहिली ही धक्कादायक बाब
लोकांनी अशी हालचाल पाहून जिवंत असण्याची शक्यता व्यक्त केली. जवळच्याच एका डॉक्टरला बोलावले. यानंतर डॉ. तरुण दुआ यांना बोलावून चेकअप करण्यात आले, मग वरिष्ठ चिकित्सक डॉ. संगतानी यांनी येऊन नस तपासली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
नाडी तपासली, ईसीजीही केली
डॉ. दीपक व्यास म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात दयाशंकर नावाच्या व्यक्तीचे कुटुंबीय मृतावस्थेत त्यांना घेऊन आले होते. कुटुंबीयांना त्यांचे श्वासोच्छवास सुरू असल्याची शक्यता वाटत होती. खूप वेळपर्यंत नाडी तपासली आणि ईसीजीही करण्यात आली. परंतु श्वासोच्छवास सुरू झाला नाही. यादरम्यान दोन तासांपर्यंत मुक्तिधामपासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत लोकांमध्ये या घटनेची चर्चा होत होती. जिल्हा रुग्णालयाबाहेरही लोकांची भलीमोठी गर्दी जमली होती.

Post a Comment

 
Top