0
 • News about Virat kohli centuryविशाखापट्टणम - भारत आणि वेस्ट इंडीजमधील दुसरा वनडे रोमांचक सामना बुधवारी अखेरच्या चेंडूवर बरोबरीत सुटला. कर्णधार विराट कोहलीच्या (१५७*) शतकाच्या जोरावर भारताने ६ बाद ३२१ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने ७ बाद ३२१ धावा करत भारताला विजयापासून रोखले. सामन्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.

  वेस्ट इंडीजला अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची आवश्यकता होती. मात्र, उमेश यादवच्या षटकात अखेरच्या चेंडूवर अटीतटीचा सामना ड्रॉ झाला. विंडीजला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज होती. शतकवीर शाई हॉपने चौकार खेचत सामना बरोबरीत आणला. भारत आता पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. भारताचा हा एकूण ९५० वा एकदिवसीय सामना होता.
  विंडीजच्या यष्टिरक्षक शाई होपने १३४ चेंडूंत १० चौकार व ३ षटकार खेचत नाबाद १२३ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याने शिमरोन हेतमायेरसोबत चौथ्या गड्यासाठी १४३ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारताचा विजय दूर राहिला. हेतमायरचे दुसरे शतक ६ धावांनी हुकले. त्याने ६४ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकार खेचत ९४ धावा केल्या. हेमराजने ३२ धावांचे योगदान दिले. केरॉन पॉवेलने १८, जेसन होल्डर १२, सॅम्युअल्सने १३ धावा जोडल्या. भारताच्या कुलदीप यादवने ६७ धावा देत ३ गडी बाद केले.
  कोहलीच्या वेगवान १० हजार धावा 
  भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले ३७ वे शतक साजरे केले. त्याचबरोबर त्याने सर्वात वेगवान १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. आपल्या खेळीतील ८१ वी धाव घेताच वनडेध्ये सर्वात वेगवान १० हजार धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. भारतीय कर्णधाराने आपल्या २०५ डावांत ही कामगिरी केली. सचिनला त्यासाठी २५९ डाव खेळावे लागले. विराटने एका वर्षात सर्वात वेगवान हजार धावादेखील पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाचा विक्रम मोडला. विराटने ११ डावांत आपल्या हजार धावा पूर्ण केल्या. विराटने १२९ चेंडूंत ११३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १५७ धावा ठाेकल्या. सलामीवीर शिखर धवन २९, यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने २०, ऋषभ पंतने १७ आणि रवींद्र जडेजाने १३ धावांचे योगदान दिले.
  धावफलक 
  भारत धावा चेंडू ४ ६ 
  राेहित झे. हिटमायर गो. रोच ०४ ०८ ०१ ० 
  धवन पायचित गो. नुर्स २९ ३० ०४ १ 
  विराट काेहली नाबाद १५७ १२९ १३ ४ 
  रायडू त्रि. गो. नुर्स ७३ ८० ०८ ० 
  धोनी त्रि. गो. मॅकोय २० २५ ०० १ 
  पंत पायचित गो. सॅमुअल्स १७ १३ ०२ ० 
  जडेजा झे. पावेल गो. मॅकोय १३ १४ ०२ ० 
  मो. शमी नाबाद ०० ०१ ०० ० 
  अवांतर : ०८. एकूण : ५० षटकांत ६ बाद ३२१ धावा. गाेलंदाजी : होल्डर ६-०-५०-०, रोच १०-०-६७-१, नुर्स १०-०-४६-२, बिशू १०-०-४८-०, मॅकोय ९-०-७१-२, सॅम्युअल ५-०-३६-१.
  वेस्ट इंडिज धावा चेंडू ४ ६ 
  के.पाॅवेल झे.पंत गाे.शमी १८ २० ०३ ० 
  हेमराज त्रि.गाे. कुलदीप ३२ २४ ०६ ० 
  शाई हाेप नाबाद १२३ १३४ १० ३ 
  सॅम्युअल्स त्रि. गो. कुलदीप १३ १० ०३ ० 
  हेटमेयर झे.कोहली गाे.चहल ९६ ६४ ०४ ७ 
  पाॅवेल झे. रोहित गो. कुलदी
  प १८ १८ ०१ १ 
  जेसन हाेल्डर धावबाद १२ २३ ०० ० 
  नुर्स झे. रायडू गो. उमेश ०५ ०७ ०० ० 
  केमार राेच नाबाद ०० ०० ०० ० 
  अवांतर : ६ एकुण : ५० षटकांत ७ बाद ३२१ धावा. गाेलंदाजी : माे. शमी १०-०-५९-१, उमेश यादव १०-०-७८-१, कुलदीप यादव १०-०-६७-३, जडेजा १०-०-४९-०, यजुवेंद्र चहल १०-०-६३-१.
  कोहली-रायडू जोडीने केली १३९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी 
  नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा अवघ्या ४ धावांवर परतला. विराटने रायडूसोबत तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे भारत मजबूत स्थितीत पोहोचला. अंबाती रायडूने ८० चेंडूंत ८ चौकार आणि एक षटकार लगावत ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली. रायडूला अॅश्ले नुर्सने त्रिफळाचीत केले.

Post a Comment

 
Top