0
गुवाहाटी - सामनावीर विराट काेहली (१४०) अाणि राेहित शर्माच्या (नाबाद १५२) द्विशतकी भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने रविवारी सलामीच्या वनडेत विंडीजचा पराभव केला. यजमान भारताने घरच्या मैदानावर ४२.१ षटकांत अाठ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी विशाखापट्टनम येथे हाेईल. पाहुण्या विंडीजचा दाैऱ्यातील हा सलग तिसरा पराभव ठरला. यात कसाेटी मालिकेतील दाेन पराभवांचा समावेश अाहे.

प्रथम फलंदाजी करताना विंडीजने विजयासाठी भारतासमाेर ३२३ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. भारताने दाेन गड्यांच्या माेबदल्यात हे टार्गेट गाठले. यासह यजमान भारताने मालिकेमध्ये विजयी सलामी दिली.
नाणेफेक जिंकून यजमान भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार काेहलीचा हा निर्णय गाेलंदाज शमीने याेग्य ठरवला. त्याने सलामीवीर हेमराजला (९) बाद केले. मार्लाेन सॅम्युअल्स (०) स्वस्तात बाद झाला.
२०१४ नंतर माेठी खेळी : विंडीजला तब्बल चार वर्षांनंतर टीम इंडियाविरुद्ध ३०० पेक्षा अधिक धावसंख्या उभी करता अाली. यापूर्वी कॅरेबियन टीमने २०१४ मध्ये काेचीच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्ध वनडेत ६ बाद ३२१ धावा काढल्या हाेत्या. अाता चार वर्षांनंतर विंडीजला हे यश मिळाले.

विराट विक्रमाची नाेंद काेहलीने नावे विक्रमाची नाेंद केली. त्याने पाच वेळा एका सत्रात २ हजारपेक्षा अधिक धावा काढल्या. अाता त्याने २ हजार धावा पुर्ण केल्या. त्याने सर्वात कमी २०४ डावात विक्रमी ३६ वे शतक साजरे केले. यासह त्याने सचिनला मागे टाकले. याशिवाय त्याने करिअरमधील ६० वे शतक (३६ वनडे व २४ कसाेटी) पुर्ण केले. असे करणारा ताे जगातील पाचवा फलंदाज ठरला.यात सचिन (१००) अव्वल अाहे.
धावफलक 
वेस्ट इंडीज धावा चेंडू ४ ६ 
के.पाॅवेल झे.धवन गाे. अहमद ५१ ३९ ०६ २ 
हेमराज त्रि.गाे. माे. शमी ०९ १५ ०२ ० 
शाई हाेप झे. धाेनी गाे. शमी ३२ ५१ ०२ ० 
सॅम्युअल्स पायचीत गाे. चहल ०० ०२ ०० ० 
हेटमेयर झे.ऋषभ गाे. जडेजा १०६ ७८ ०६ ६ 
राेवमान पाॅवेल त्रि.गाे. जडेजा २२ २३ ०४ ० 
जेसन हाेल्डर त्रि.गाे. चहल ३८ ४२ ०५ ० 
नुर्स पायचीत गाे. चहल ०२ ०२ ०० ० 
देवेंद्र बिशू नाबाद २२ २६ ०३ ० 
केमार राेच नाबाद २६ २२ ०२ १
अवांतर : १४ एकूण : ५० षटकांत ८ बाद ३२२ धावा. गाेलंदाजी : माे. शमी १०-०-८१-२, उमेश यादव १०-०-६४-०, खलिल अहमद १०-०-६४-१, यजुवेंद्र चहल १०-०-४१-३, रवींद्र जडेजा १०-०-६६-२.

भारत धावा चेंडू ४ ६ 
राेहित शर्मा नाबाद १५२ ११७ १५ ८ 
शिखर धवन त्रि.गाे. थाॅमस ०४ ०६ ०१ ० 
काेहली यष्टी. हाेप गाे. बिशू १४० १०७ २१ २ 
अंबाती रायडू नाबाद २२ २६ ०१ १ 
अवांतर : ०८. एकुण : ४२.१ षटकांत २ बाद ३२६ धावा. गाेलंदाजी : राेच ७-०-५२-०, थाॅमस ९-०-८३-१, हाेल्डर ८-०-४५-०, नुर्स ७-०-६३-०, बिशू १०-०-७२-१, हेमराज १.१-०-९-०.
राेहित- काेहलीने रचला विजयी पाया 
काेहली व राेहितने दुसऱ्या विकेटसाठी २४६ धावांची भागीदारी केली. काेहलीने १०७ चेंडूंत २१ चाैकार अाणि २ षटकारांसह १४० धावा काढल्या. त्याचे हे ३६ वे वनडे शतक ठरले. तसेच राेहितने ११७ चेंडूंत १५ चाैकार व ८ षटकारातून नाबाद १५२ धावा काढल्या. यासह त्याने २० वे वनडे शतक सा
जरे केले.

Post a Comment

 
Top