0
  • पुणे - राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास ३० ऑक्टाेबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. यापूर्वी २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करणे आवश्यक होते. मात्र, ऑनलाइन अर्ज सरल डाटाबेसवरून नियमित शुल्कासह माहिती भरताना कनिष्ठ महाविद्यालयांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बोर्डाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. सरल डाटाबेसवर अर्ज सेव्ह होत नसल्यास मंडळाच्या दोन्ही संकेतस्थळांवरील ऑल अॅप्लिकेशन्सच्या लिंकवरूनही अर्ज पाठवता येतील, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top