केवडिया - भारताचे लाेहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या पुतळ्याचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले आहे. लोकार्पण होण्याआधी सभामंडपात महादेवाला जलाभिषेक करण्यात आला. यासाठी गंगा-यमुना-गोदावरी या प्रमुख नद्यांसह देशातील ३० नद्यांच्या पाण्याचे कलश केवडिया येथे पोहोचले. ३० ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवलिंगास जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सरदार पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्टॅच्यू ऑफ युनिटीचे अनावरण झाले. राज्य सरकारच्या वतीने स्वत: मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पटेल यांच्या ५७ वंशजांना निमंत्रण पाठवले होते. यापैकी ३७ वंशज भारतात, तर २० परदेशात राहतात.

Post a Comment