मुंबई- बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळील धोकादायक वळणावर खासगी बस 30 फूट खोल दरीत कोसळली. बस दोन झाडामध्ये अडकल्याने जीवितहानी झाली नाही. या अपघातात दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.
मिळालेली माहिती अशी की, खोपोलीचे जैन धर्मीय भाविक गुरुवारी सकाळी पाबळ येथे तीर्थयात्रेला गेले होते. रात्री ते परतत असताना हा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून सर्व भाविक थोडक्यात बचावले. बसमध्ये 45 प्रवासी होते. त्यात पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. बोरघाट पोलिस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment