नंदुरबार- दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याच्या कारणावरून येथील प्रभाग क्रमांक १० 'अ'च्या शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी अर्जुन मराठे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तसे आदेश दिले.
शासनाच्या आदेशानुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास निवडणुकीत उभे राहता येत नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यानंतरही कल्याणी अर्जुन मराठे यांनी याविषयी प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दिली. त्यांच्याविरोधात भाजपच्या पुष्पाबाई विठ्ठल चौधरी यांनी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे १९ जानेवारीला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली. सुनावणीत नगरसेविका मराठे यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले. या प्रभागातून क्रमांक दोनची मते मिळवणाऱ्या पुष्पाबाई चौधरी यांना विजयी घोषित करण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे या विषयीचा अर्ज फेटाळण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment