0
  • 5.97 Cr donation in shirdi sai templeशिर्डी - साईबाबा संस्थानतर्फे १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळ्याच्या समारोपासाठी देश- विदेशातील सुमारे ३ लाखांवर भक्तांनी समाधीचे दर्शन घेत साईंच्या झोळीत तब्बल ५ कोटी ९७ लाखांचे दान अर्पण केले. यामध्ये २१ देशांतील २४ लाख २५ हजारांच्या परकीय चलनाचा समावेश आहे.


    संस्थानच्या
    मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, सशुल्क व ऑनलाइन पासद्वारे ७८ लाख ६१ हजार रुपये देणगी प्राप्त झाली. साई प्रसादालयात २ लाख २३ हजार ६२४ भक्तांनी प्रसाद भोजनाचा तर ४५ हजार ५२७ भक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला. १ लाख १४ हजार ६२ लाडू पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे २८ लाख ५१ हजार ५५० रुपये प्राप्त झाले. २ लाख ५० हजार बुंदी प्रसाद पाकिटांचे दर्शन रांगेतून भक्तांना मोफत वाटप झाले. 
    साई आश्रम भक्तनिवास, साई धर्मशाळा, श्री साईबाबा भक्त निवासस्थान (५०० खोल्या) व साईप्रसाद निवास आदी ठिकाणी ५४ हजार ७८७ भक्तांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी सुमारे सहा हजार मंडप उभारले होते.

Post a Comment

 
Top