0
लुधियाना - हरियाणात पतीशी भांडण झाल्यानंतर पत्नी 5 वर्षांच्या मुलीसोबत माहेरी गेली. तिच्या दिव्यांग वडिलांनी तिची समजूत घालून पुन्हा पतीकडे परत जाण्याचा सल्ला दिला. परंतु परिसरातील एका महिलेने तिला हरियाणाला पोहोचण्याआधीच रेल्वेतून उतरवले आणि गप्पांमध्ये गुंतवून सेाबत नेले. पीडितेचा आरोप आहे की, त्या महिलेने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार घडवला. आणि नंतर तिला ड्रग्जचे व्यसन लावून तिच्याकडून देहव्यापार करवून घेऊ लागली. पीडितेला 3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी विकण्यात आले. विरोध केल्यावर तिच्या मुलीला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली जायची. 8 महिने तिच्याकडून अशा प्रकारे जबरदस्ती देहव्यापार करवून घेण्यात आला. चौथ्या वेळी तिला विकण्याआधी परिसरातील काही लोकांना तिची दया आली, तेव्हा त्यांनी तिची सुटका केली.


बोलतानाही थरथर कापते पीडिता
लोकांनीच देहव्यापार करायला लावणाऱ्या 2 महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेला उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती एवढी दहशतीत आहे की, बोलतानाही थरथर कापत राहते. एसएचओ पवित्र सिंह म्हणाले की, पीडितेचा जबाब बाकी आहे. तिचा जबाब झाल्यावर स्थिती आणखी स्पष्ट होईल. त्यानुसारच पुढील कारवाई करू.

टेन्शन कमी करण्याचे सांगून द्यायची औषध
पीडितेने सांगितले की, महिला तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली होती आणि मानसिक त्रास असल्याचे सांगून तिला औषध खाऊ घातले. अनेक पट जास्त डोस देऊन तिला नशेमध्ये ठेवू लागली. यानंतर बळजबरी वेगवेगळी औषधे दिली जाऊ लागली. यामुळे ती बेशुद्ध व्हायची. मग तिच्यावर बलात्कार केला जायचा. पीडितेचा आरोप आहे की, तिला इंजेक्शन दिले जायचे. तथापि, अजूनही डॉक्टर अथवा पोलिसांनी याची पुष्टी केलेली नाही.

अशी सुटली महिला
पीडितेने सांगितले की, महिलेने तिला तिच्याजवळ दोन-तीन महिने ठेवले, मग रेहड़ू साहिबच्या एका महिलेला विकले. यानंतर तेथून तिला डाबा परिसरात विकण्यात आले. आता डाबा येथील महिला तिला आणखी चौथ्या ठिकाणी विकणार होती. शुक्रवारी रात्री तिची तब्येत बिघडली. परंतु त्या कुंटणखान्याच्या आंटीला अर्जंट दुसरीकडे जायचे होते. यामुळे तिला शेजाऱ्यांकडे सोडले. तेथील महिला पवनदीप कौरने तिची हालत आणि मुलीच्या जखमा पाहून तिला खोदून-खोदून विचारले, तेव्हा तिने हिंमत करून सर्वकाही सांगून टाकले. यावर पवनदीपने वडील बलविंदर सिंह यांना ही बाब सांगितली. त्यांनी कुलदीप सिंह, गुरचरण सिंह, रविंदर सिंह यांना बोलावले आणि आपसात सल्लामसलत करून शनिवार सकाळी तिला घ्यायला आलेल्या दोन महिलांना पकडून ठेवले. त्यांनी यादरम्यान  महिला पीडिताला ओढून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

महिला एवढी दहशतीत आहे की, बोलतानाही थरथर कापते

  • woman molestation case in Ludhiana

Post a comment

 
Top