मुंबई- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकापरिसरात लोकलवर अज्ञातांनी केलेल्या तुफान दगडफेकीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. कांचन हाटले असे जखमी महिलेचे नाव असूनतिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. कांचन यांच्या चेहर्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा ओठ फाटला असून 2 दात तुटले आहेत. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोण आहेत कांचन हाटले?कांचन या दिवा पश्चिमेला राहातात. मुलुंड येथील एका खासगी कंपनीत काम करतात. गुरुवारी रात्री ऑफिसमधून निघाल्यावर ठाण्याहून त्यांनी नऊ वाजेच्या डोंबिवली स्लो लोकल पकडली. त्या लेडीज फर्स्ट क्लास डब्यात बसल्या होत्या. लोकल मुंब्रा खाडी पुलाजवळ आली असता अचानक अज्ञातांनी लोकलवर दगडफेक केली. यात कांचन यांच्यासोबतएक तरुणी जखमी झाली. कांचनच्या चेहऱ्यावर दगड जोरात आपटल्याने तिचा ओठ फाटला असून दोन दात तुटले आहेत. कांचन यांनी आधी शास्त्रीनगरातील केडीएमसीच्या रुग्णालयात आणि नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये दाकल करण्यात आले आहे. कांचन यांच्या ओठांवर रात्रीच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिसात करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment