- साप नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला आहे. लोक सापाला घाबरतातही. विविध धर्म ग्रंथांमध्ये नागांशी संबंधित कथा सांगण्यात आल्या आहेत. महाभारताच्या आदी पर्वामध्ये नागांच्या उत्पत्ती आणि राजा जन्मेजयने केलेल्या नागदाह यज्ञाशी संबंधित कथेचे वर्णन आहे. ही कथा अत्यंत रोचक आहे. आज आम्ही तुम्हाला नाग वंशच्या उत्पत्तीशी संबंधित तीच कथा सांगत आहोत.
अशी झाली नाग वंशाची उत्पत्ती
- महाभारतानुसार, महर्षी कश्यप यांना 13 पत्नी होत्या. यामध्ये कद्रू नावाची एक पत्नी होती. कद्रूने पती महर्षी कश्यप यांची खूप सेवा केली. महर्षी कश्यप तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन तिला वरदान मागण्यास सांगतात.
- कद्रूने एक हजार तेजस्वी नाग पुत्रांचे वरदान मागितले. महर्षी कश्यप यांनी वरदान दिले आणि अशाप्रकारे नाग वंशाची उत्पत्ती झाली.
- महर्षी कश्यप यांच्या आणखी एका पत्नीचे नाव विनता होते. पक्षीराज गरुड विनताचे पुत्र आहेत.
- एकदा कद्रू आणि विनता यांनी एक पांढरा घोडा पाहिला. त्या घोड्याला पाहून कद्रूने घोड्याची शेपटी काळी तर विनताने घोड्याची शेपटी पांढरी असल्याचे सांगितले.
- या गोष्टींवरून दोघींमध्ये पैज लागली. त्यानंतर कद्रूने आपल्या नाग पुत्रांना शरीराचा आकार छोटा करून शेपटीवर बसण्यास सांगितले ज्यामुळे शेपटी काळी दिसेल. काही नाग पुत्रांनी असे करण्यास नकार दिला. तेव्हा कद्रूने नाग पुत्रांना शाप दिला की, तुम्ही राजा जन्मेजयच्या यज्ञामध्ये भस्म व्हाल.
- शापाच्या भीतीने नाग पुत्रांनी आईच्या इच्छापूर्तीसाठी आज्ञेचे पालन केले. पैज हरल्यामुळे विनता कद्रूची दासी झाली.
- जेव्हा गरुडाला समजले की त्याची आई दासी झाली आहे, तेव्हा गरुडाने कद्रू आणि त्याच्या सर्प मुलांना विचारले की, मी तुम्हाला सही कोणती वस्तू आणून देऊ ज्यामुळे माझी आई तुमच्या गुलामीतून मुक्त होईल.
- तेव्हा सर्पांनी स्वर्गातील अमृताची इच्छा व्यक्त केली. आपल्या पराक्रमाने गरुडाने स्वर्गातून अमृत कलश आणून कुश (एक प्रकारचे धारधार गवत)वर ठेवला.
- अमृत पिण्यापुर्वी सर्प स्नान करण्यासाठी गेले तेव्हा इंद्रदेव अमृत कलश पुन्हा स्वर्गात घेऊन आले. हे पाहून सापांनी ते गवत चाटण्यास - सुरुवात केली, ज्यावर अमृत कलश ठेवला होता. असे केल्यामुळे त्यांच्या जीभीचे दोन तुकडे झाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment