0
अमृतसर, पंजाब - अमृतसरच्या एका हॉटेलमध्ये मंगळवारी पती-पत्नी आणि 'तो' मध्ये मोठा वाद झाला. गुरुद्वारामध्ये चालल्याचे सांगून पत्नी घरातून निघाली, ते थेट हॉटेलमध्ये आपल्या प्रियकराला भेटायला गेली होती. परंतु, तिचा पती आधीपासूनच तिच्यावर पाळत ठेवून होता. तोही पाठलाग करत हॉटेलमध्ये येऊन धडकला. यानंतर तिघांमध्येही फिल्मी स्टाइल मारहाण होऊ लागली. तथापि, घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी तिघांनाही पकडून पोलिस स्टेशनला आणले.


- नवांशहरचे रहिवासी हरिंदर सिंह म्हणाले की, त्यांचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना 8 आणि 4 वर्षांचे अशी 2 मुले आहेत. हरिंदर म्हणाले की, पत्नी खोटे बोलून आपल्या प्रियकराला भेटायला घरातून निघाली होती. तथापि, त्यांना आधीपासूनच दोघांवरही संशय होता. काही महिन्यांपासून पत्नीच्या वागण्यात खूप फरक पडला होता.
-हरिंदर सिंह म्हणाले, जेव्हा त्यांचा संशय बळावला, तेव्हा त्यांनी पत्नीचे मोबाइल कॉल डिटेल्स काढले. पत्नीने एक बनावट आधार कार्डही बनवून ठेवले होते. ज्यात तिने आपल्या प्रियकर जतिंदर सिंहचे नाव पती म्हणून लिहून ठेवले होते. याच आधार कार्डच्या माध्यमातून ती रूम बुक करायची. तिने शेरांवाला गेट स्थित होटलमध्ये रूम बुक केली होती. प्रियकरालाही 18 वर्षांचा एक मुलगा आहे.

- तथापि, एडीसीपी जगजितसिंह वालिया म्हणाले की, पोलिस याप्रकरणी कोणतीही दखल देऊ शकत नाहीत. यांना वाटले तर ते कोर्टात जाऊ शकतात.
husband Caught Red Handed His wife and boyfriend Shocking Video goes Viral

Post a comment

 
Top