नवी दिल्ली - पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यानुसार पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून. या पाचही राज्यांच्या मतदानानंतर 11 डिसेंबरला पाचही राज्यांची मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल.
UPDATE
- छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत होणार मतदान. पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला.
- मध्यप्रदेशात 28 नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान. मतदान
- मिझोरममध्ये 28 नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान. मतदान
- राजस्थानात 7 डिसेंबर रोजी एका टप्प्यात मतदान.
- तेलंगणात 7 डिसेंबर रोजी एका टप्प्यात मतदान.
- पाचही राज्यांची मतमोजणी आणि निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार.
सविस्त निवडणूक कार्यक्रम असा
छत्तीसगड पहिला टप्पा (यात नक्षलग्रस्त भागात मतदान होणार)
अधिसूचना : 16 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर
अर्जांची छाननी : 24 ऑक्टोबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टोबर
मतदान : 12 नोव्हेंबर
एकूण जागा : 18
अधिसूचना : 16 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर
अर्जांची छाननी : 24 ऑक्टोबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टोबर
मतदान : 12 नोव्हेंबर
एकूण जागा : 18
छत्तीसगड दुसरा टप्पा
एकूण जागा : 72
अधिसूचना : 26 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 3 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर
एकूण जागा : 72
अधिसूचना : 26 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 3 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर
मध्यप्रदेश आणि मिझोरम
अधिसूचना : 2 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 12 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर
मतदान : 28 नोव्हेंबर
राजस्थान आणि तेलंगाना
अधिसूचना : 12 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 20 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर
मतदान : 7 डिसेंबर
अधिसूचना : 12 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 20 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर
मतदान : 7 डिसेंबर
सर्व राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होतील.
कोणत्या राज्यात कधी संपणार विधानसभांचा कार्यकाळ
छत्तीसगड : 5 जानेवारी 2019
मध्यप्रदेश : 7 जानेवारी 2019
राजस्थान : 20 जानेवारी 2019
मिझोरम : 15 डिसेंबर 2018
छत्तीसगड : 5 जानेवारी 2019
मध्यप्रदेश : 7 जानेवारी 2019
राजस्थान : 20 जानेवारी 2019
मिझोरम : 15 डिसेंबर 2018
वेळेचा वाद
पत्रकार परिषदेसाठी आधी 12.30 ची वेळ देण्यात आली होती, पण नंतर निवडणूक आयोगाने 3 ची वेळ जाहीर केली. दरम्यान काँग्रेसने मोदींची सभा 1 वाजता असल्याने निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचा आरोप केला. पण निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, एका राज्यामुळे पत्रकार परिषदेला उशीर झाला.
सध्या यापैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे. तेलंगणामध्ये टीआरएसने नुकतीच विधानसभा विसर्जित केली होती. ठरलेल्या वेळेआधी निवडणुका व्हाव्या अशी त्यांची इच्छा होती. त्याठिकाणी पुढील वर्षी निवडणूक होणार होती. तर मिझोरममध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
2013 ची स्थिती
पक्ष | मध्यप्रदेश | छत्तीसगड | राजस्थान |
भाजप | 165 | 49 | 163 |
काँग्रेस | 58 | 39 | 21 |
बसपा | 4 | 1 | 3 |
इतर | 3 | 1 | 13 |
एकूण | 230 | 90 | 200 |
सध्याचे सरकार | भाजप | भाजप | भाजप |
लोकसभा निवडणूक 2014 ची स्थिती
पक्ष | मध्यप्रदेश | छत्तीसगड | राजस्थान |
भाजप | 27 | 10 | 25 |
काँग्रेस | 2 | 1 | 0 |
बसपा | 0 | 0 | 0 |
एकूण | 29 | 11 | 25 |
सत्तेचे दावेदार
मध्यप्रदेश : शिवराज सिंह चौहान, कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया
छत्तीसगड : रमन सिंह, अजित जोगी, भूपेष बघेल, टीएस सिंहदेव
राजस्थान : वसुंधरा राजे सिंधिया, अशोक गेहलोत, सचिन पायलट
छत्तीसगड : रमन सिंह, अजित जोगी, भूपेष बघेल, टीएस सिंहदेव
राजस्थान : वसुंधरा राजे सिंधिया, अशोक गेहलोत, सचिन पायलट
प्रत्येक ठिकाणी प्रचाराचे तीनच चेहरे : नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी
विधानसभांचा कार्यकाळ
राज्य | जागा | कार्यकाळ |
मिझोराम | ५० | १५ डिसेंबर २०१८ |
छत्तीसगड | ९० | ०५ जानेवारी २०१९ |
मध्य प्रदेश | २३० | ०७ जानेवारी २०१९ |
राजस्थान | २०० | २० जानेवारी २०१९![]() |
Post a comment