0
 • मुंबई - अखेर २५ वर्षांनंतर राज्यात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढील वर्षीपासून घेण्यात येणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने यासंदर्भातील अादेश मंगळवारी जारी केला. वास्तविक यंदापासूनच या निवडणुका होणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्या होऊ शकल्या नाहीत. मात्र, आता पुढील वर्षीपासून निवडणुकांचा फड रंगणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित होण्याच्या दृष्टीने या निवडणुका महत्त्वपूर्ण ठरतील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. दुसरीकडे भारतीय विद्यार्थी सेनेनेही काही अटी सांगत या निवडणुकांना तयार असल्याचे सांगितले.


  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महा
  विद्यालयीन निवडणुकांमधून खऱ्या अर्थाने नेतृत्वाची संधी मिळावी व लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅम्पसवर विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठीचे एकरूप परिनियम तयार केले आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये तरतूद केल्याप्रमाणे पुढील काळामध्ये महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पार पडतील. गेली अनेक वर्षे महाविद्यालयीन निवडणुकांची चर्चा सुरू होती, अगदी लिंगडोह कमिटीपासून यात अनेक सूचना मांडण्यात आल्या होत्या.

  महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी संघटना अशा प्रकारच्या नि
  वडणुकांची मागणी करत होते. त्यास अनुसरून या निवडणूक प्रक्रियेसंबंधात विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, विद्यापीठातील प्राधिकरणे अशा सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून एक शास्त्रशुद्ध आणि परिपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा या परिनियमाच्या माध्यमातून एक प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या परिनियमांमध्ये निवडणूक लढवण्याकरिता पात्रता, निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून त्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. 
  या मंडळांवर असेल विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व नवीन महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यामध्ये विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष व सचिव हे विद्यापीठांच्या विविध प्राधिकरणांवर निवडून येतील, ज्यामध्ये विद्यार्थी परिषद, अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यार्थी विकास मंडळ, महाविद्यालय विकास मंडळ, क्रीडा व शारीरिक विकास मंडळ यासारख्या प्राधिकरणांवर आता विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व असणार आहे.या विविध प्राधिकरणांवरील प्रतिनिधित्वांमुळे विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, समस्यांचे निराकरण करण्याबरोबर विद्यार्थी विकासाच्या अनेक योजना राबवण्यास मदत होणार आहे.
  निवडणुकीसाठी नियम व आचारसंहिता 
  विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणाऱ्या या निवडणुकांसाठी कडक आचारसंहिता तयार करण्यात आली असून निवडणूक लढवणार असणारा विद्यार्थी पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतलेला असावा, त्या विद्यार्थ्याला त्या वर्षी एटीकेटी नसावी, तो फेरप्रवेशार्थी नसावा आणि ३० सप्टेंबर रोजी त्याच्या वयाची मर्यादा पंचवीस वर्षे असावी अशा अटी निवडणुकीसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी घालण्यात आलेल्या आहेत. तसेच कोणताही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचे चिन्ह उमेदवारांना वापरण्यात येणार नाही. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारचे मिळावे किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली असून निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केल्या जाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

Post a Comment

 
Top