कोलकाता - शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कोलकाता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला बुधवारी (3 ऑक्टोबर) सकाळी अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमण दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले. या रुग्णालयातून 250 रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आगीच्या घटनेत अद्याप कुठल्याही जीवित हानीचे वृत्त नाही.
मेडिकलला लागली आग, सर्वच रुग्ण सुरक्षितप्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग सर्वप्रथम रुग्णालयातील मेडिकलला लागली. यानंतर वेळीच अग्निशमण दलाला घटनास्थळी बोलावण्यात आले. फार्मसी विभागाच्या इमारतीतून निघणाऱ्या आगीचा धूर सकाळी 8 वाजता संपूर्ण परिसरात पसरला होता. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या मेडिकलला आग लागली. या आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक महापौरांनी सांगितले, की सर्वच रुग्णांना सुरक्षितरित्या बाहेर काढून इतरत्र हलवण्यात आले आहे. आगीने परिसरात धूर पसरला असून लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल.-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment