0
 • गुडगाव - येथे 40 लाख रुपयांच्या वादावरून एका व्यक्तीने आपल्या बिझनेस पार्नरचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली. या हत्येमध्ये त्याने आपल्या पत्नी आणि एका मित्राची देखील मदत घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पार्टनरचा मर्डर केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तब्बल 25 तुकडे केले. हे सर्व तुकडे त्याने दोन बॅगांमध्ये भरून कैक किमी पर्यंत हायवेवर एक-एक करून फेकले. यानंतर घरी परतलेल्या आरोपीने एक असे नाट्य रचले की त्यावरूनच तो पोलिसांच्या तावडीत सापडला.


  40 लाख बुडवल्यानंतर झाला होता वाद
  > ही घटना गुडगावच्या डीएलएफ फेज-2 मध्ये घडली आहे. येथे राहणाऱ्या आरोपी हरनेक सिंगने आपला बिझनेस पार्टनर जसकरण सिंगकडून 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कित्येक दिवस झाल्यानंतरही हरनेक कर्ज फेडण्याचे नाव घेत नव्हता. नेहमीच मिळणाऱ्या उडवा-उडवीच्या उत्तरांना कंटाळून जसकरणने आपले पैसे वसूल करण्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी हरनेकचे घर गाठले.
  > याच ठिकाणी हरनेक आणि जसकरण यांच्यात जोरदार भांडण पेटले. आरोपी हरनेकने आपली पत्नी गुरमेहर कौकर आणि एका मित्राच्या मदतीने जसकरण घरात बांधून ठेवले. यानंतर त्याची धारदार शस्त्राने हत्या केली.

  मृतदेहाचे केले 25 तुकडे
  गुडगाव पोलिसांचे प्रवक्ते सुभाष बोकन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरनेकने आपल्या पत्नी आणि मित्राच्या मदतीने पीडित जसकरणच्या मृतदेहाचे 25 तुकडे केले. हे तुक
  डे त्याने दोन बॅगांमध्ये भरले आणि विल्हेवाट लावण्यासाठी कार आपले मूळ गाव लुधियाणाच्या दिशेने नेली. या दरम्यान हायवेवर त्याने एक एक करून विविध ठिकाणी आपल्या पार्टनरचे तुकडे फेकून दिले.

  पत्नीला म्हणाला- आपण आत्महत्या करू!
  पार्टनर जसकरण सिंगचा खून केला. त्याचे तुकडे फेकून दिल्यानंतर घरी परतताना आपण पकडले जाऊ अशी भीती त्याच्या मनात आली. यानंतर त्याने आपली पत्नी गुरमेहर कौरला सामूहिक आत्महत्या करण्यासाठी तयार केली. परंतु, ऐनवेळी गुरमेहरने आपला निर्णय बदलला. यावर संतापलेल्या आरोपीने आपल्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली.

  मग रचले सशस्त्र दरोड्याचे नाट्य, असे पकडले
  22 ऑक्टोबर रोजी आरोपी हरनेक सिंग आपल्या पत्नीचा गळा चिरला. यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःवर सुद्धा चाकूने प्रहार केले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आपल्या घरावर सशस्त्र दरोडा पडला होता. त्यांनीच आपल्या पत्नीची हत्या केली असे खोटे नाट्य रचले. यावर पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे तो देऊ शकला नाही. पोलिसांनी संशयाच्या आधारे हरनेकला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याला कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठड.......
  Gurgaon Man Kills Job Partner, Chops Body Into Pieces, Cuts Wife's Throat

Post a Comment

 
Top