0
  • मुंबई- राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या शिवस्मारकाच्या कामास अखेर मुहुर्त मिळाला आहे. मुंबईजवळील अरबी समुद्रात उभरण्यात येणार्‍या शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष कामास येत्या 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे. शिवस्मारकासाठीच्या अपेक्षित खर्चात 643 कोटींनी वाढ झाल्याचेही मेटे यांनी सांगितले आहे.
    कुठे होणार शिवस्मारक?
    - मुंबईजवळील अरबी समुद्रात असलेली शिवस्मारकाची जागा राजभवनापासून 1.2 किमी, गिरगांव चौपाटीपासून 3.6 किमी तर नरिमन पॉर्इंटपासून 2.6 किमी आहे.
    - समुद्रातील 6.8 हेल्टरच्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. 
    - लार्सन अँड टुब्रो कंपनीला या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे.
    शिवस्मारकाची वैशिष्ट्ये
    - जगातला सर्वात उंच अश्वारूढ पुतळा असून त्याची उंची 190 मीटर म्हणजेच 632 फूट इतकी असेल.
    -अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याची उंची 309 फूट असून त्याच्या दुप्पट उंचीचा हा पुतळा असेल.
    - शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटनांची माहिती देणारे कलादालन
    - वेगवेगळ्या आकाराचे दोन थिएटर्सही उभारणार
    - एक्झिबिशन सेंटर
    - जगातले सर्वात मोठे सागरी मत्स्यालय
    - महाराजांचा जीवनपट आणि महाराष्ट्राचा इतिहास उलगडणारा लेझर शो
    - सर्व सुविधा असलेले उद
    Shivsmarak work will start from 24th October in Mumbai Sea

Post a Comment

 
Top