0
औरंगाबाद- मुंबईहून औरंगाबादला आलेल्या जेट एअरवेजचे विमान चिकलठाणा विमानतळावर लँडिंग करत असतानाच बगळ्याची धडक बसली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे सुखरूप लँडिंग केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विमानातील 
  • Bird hit to jet plane in Aurangabad Airportमिळालेली माहिती अशी की, जेट एअरवेजचे (9W355) हे विमान चिकलठाणा विमानतळावर लँड‍िंग करत असताना विमानाचा डाव्या पंख्याला बगळ्याची धडक बसली. अपघातानंतरही वैमानिकाने विमान सुखरूप धावपट्टीवर उतरवले.
    आमदार अतुल सावेसह भागवत कराड यांच्यासह 21 प्रवाशांचा खोळंबा..
    अपघातग्रस्त विमानाची तपासणी केल्यानंतर या विमानाचे औरंगाबाद ते मुंबई उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे मुंबईला जाणारे आमदार अतुल सावे, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बापू घडामोडे यांच्यासह 21 प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.प्रवाशांचा जीव थोडक्यात बचाव

Post a comment

 
Top