0
मुंबई - सोमवारी मलाड वेस्टमध्ये माइंडस्पेसजवळ झुडपांमध्ये एका ट्रॅव्हल बॅगमध्ये आढळलेल्या 20 वर्षीय तरुणीच्या मृतदेहाचे रहस्य पोलिसांनी अवघ्या 4 तासांतच उलगडले आहे. हा मृतदेह मॉडेल मानसी दीक्षितचा आहे. मानसीच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी तिच्या एका मित्राला अटक केली आहे.

यामुळे झाली मॉडेलची हत्या

बांगूरनगर पोलिसांच्या मते, मिल्लतनगरातील रहिवासी मुजम्मिल सईद (20) नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मुजम्मिलने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यने सांगितले की, घटनेच्या वेळी मानसी त्याच्या फ्लॅटमध्येच होती. दोघांमध्ये काही गोष्टींवरून वाद झाला आणि चुकून त्याने मानसीच्या डोक्यावर स्टूल मारला, यामुळे अनवधानाने मानसीचा मृत्यू झाला.

एक कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती मैत्री
मानसी दीक्षित राजस्थानच्या कोटातील रहिवासी होती आणि मागच्या 6 महिन्यांपासून अंधेरीत राहत होती. पोलिसांनी सांगितले की, सईद आणि मानसीमध्ये एका कॉमन मित्राच्या माध्यमातून मैत्री झाली होती.

पोलिस असे पोहोचले आरोपीपर्यंत
पोलिसांनी सांगितले की, त्यांना सुटकेसची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह होता, तिच्या डोक्यावर जखम होती. तिची डेडबॉडी कुशन आणि बेडशीटने कव्हर करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी याप्रकरणी चौकशीmumbai police solved model murder case in just 4 hours

Post a Comment

 
Top