0
  • Two died in a accident on surat road near Dhuleधानोरा (जि. धुळे)- साखरपुड्यासाठी धानाेऱ्याहून सुरतकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलला अायशर टेम्पाेने दिलेल्या धडकेत दाेन्ही वाहनांच्या चालकांचा मृत्यू झाला, तर धानोरा येथील २० जण जखमी झाले. धुळ्याजवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या भीषण अपघातात दाेन्ही वाहने चक्कूचर झाली.


    धानोरा येथील केळीचे व्यापारी युनूस खान यांचा मुलगा आवेश याचा साखरपुडा रविवारी बेस्तान (सुरत) येथे हाेणार हाेता. त्यानुसार शनिवारच्या रात्री ११ वाजता दोन ट्रॅव्हल करून खान परिवार व नातेवाईक सुरतकडे निघाले. एका बसमध्ये पुरुष तर एकात महिला हाेत्या. मध्यरात्री दीड वाजता पुरुषांची ट्रॅव्हल्स (एमएच १४ डब्ल्यू ०८१९) सुरत बायपासवर असताना धुळ्याकडे भाजीपाला घेऊन येणाऱ्या टेम्पाेने या बसला जाेराची धडक दिली. त्यामुळे ट्रॅव्हल दुभाजकावर आदळून उलटली. यात बसचालक गणेश शंकर शर्मा (वय ४८, दाेंडाईचा) व आयशर चालक गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना पहाटे त्यांची प्राणज्याेत मालवली. या अपघातात धानोरा, विवरा, पाळधी येथील खान यांचे नातेवाईक जखमी झाले आहेत.

    जखमींची नावे
    आरिफ खान,बशीर खान,मुझफ्फर अली,शेख जमील,शरीफ खान,अरबाज खान,जुनेद शेख यांच्यासह अनेक जण जखमी झालेले आहे. त्यांना स्थानिक धुळे,जळगाव तसेच अपघात जवळील दवाखान्यांमध्ये उपचार करण्यात आले. अपघातग्रस्तांना मदत म्हणून धानोरा येथिल डॉ जावेद खान, स्थानिक पोलिस, ग्रामस्थ तसेच उस्मान भाई,सईद शाह बरतनवाला यांनी मदत केली.

Post a Comment

 
Top