0
वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका तुरुंगात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याला दोन पुरुष कैद्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. तरीही या महिलेला जेल झालेली नाही. कोर्टाने तिला पुढील 5 वर्षे कम्युनिटी सर्व्हिस देण्याचे आदेश दिले आहेत. यात तिच्यामध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. मिशिगन कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, या महिलेला आता आयुष्यभर सेक्शुअल ऑफेंडर (गुन्हेगार) असा ठपला लागणार आहे. सोबतच, तिच्या कामकाज आणि हालचालींवर सुद्धा नेहमीच लक्ष ठेवले जाईल.
 • सेक्सच्या बदल्यात द्यायची मोबाईल फोन...
  26 वर्षीय रॅचेल जॉनसन मिशिगनच्या एका तुरुंगात कार्यरत होती. कैद्यांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्ती देण्यासाठी काउन्सलर म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, तिने याच कैद्यांवर उपचार करण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. कैदेत असलेल्या दोन पुरुषांवर तिने लैंगिक अत्याचार केले. या अत्याचाराच्या बदल्यात तिने आपल्या रुग्णांना मोबाईल फोन दिले होते.

  का झाला नाही तुरुंगवास?
  कोर्टात सरकारी वकिलांनी रॅचेल जॉनसनवर पुरुषांच्या लैंगिक शोषणाचे आरोप लावले. यापूर्वी झालेल्या सुनावण्यांमध्ये तिने कैद्यांसोबत सेक्स केल्याचे सुद्धा स्पष्ट झाला. परंतु, ऐनवेळी त्या दोन पुरुष कैद्यांनी आपल्याला पीडित मानण्यास नकार दिला. आपण पीडित नाही, सोबतच रॅचेलने आपल्यासोबत सेक्स करण्यासाठी आपल्या पदाचा वापर केला नाही. सोबतच कुठल्याही प्रकारचे आमीष दाखवले नाही अशी साक्ष दिली. त्यापैकीच एका कैद्याने आपल्याला मोबाईल फोन रॅचेलने दिल्याची कबुली दिली. परंतु, हा मोबाईल फोन तिने व्यसन सोडणार असे आश्वासन घेऊन दिले असा दावा त्याने कोर्टात केला. यामुळेच कोर्टाला महिला आरोपी असतानाही कठोर शिक्षा देता आली नाही. अशात तिच्यावर बेजबाबदारपणा, बेकायदेशीररित्या कैद्यांना मोबाईल पुरवणे आणि फोर्थ डिग्री लैंगिक शोषण प्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

  ऐनवेळी त्या दोन पुरुष कैद्यांनी आपल्याला पीडित मानण्यास नकार दिला.

  • Female counsellor is spared jail after having sex with two male prisoners at drug treatment centre

Post a comment

 
Top