0
बलरामपूर (छत्तीसगड) - बलरामपूर-रामानुजगंज जिल्ह्यातील रघुनाथनगर येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर तरुणीला पळवून नेऊन त्याने आपल्या आणखी 2 साथीदारांसोबत बलात्कार केला. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
नराधमांनी तीन दिवस तिच्यावर अत्याचार केला. यासोबतच त्यांनी तिचे एटीएम कार्ड हिसकावले आणि पैसे काढून बाइक घेतली. 30 हजार रुपयेही वाटले. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून कोर्टापुढे हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
24 वर्षीय तरुणीला हरदीबहरा गावातील सोनू कुशवाहा याने प्रेमजालात फसवले. 21 सप्टेंबर रोजी सोनूने आपल्या गावातीलच 2 मित्रांसोबत कट रचून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळून जाण्यास प्रेरित केले.
त्यांनी तरुणीला मध्य प्रदेशातील बैढन येथे नेले. येथील रेण नदीच्या पुलाजवळ एका घरात तिला ठेवून तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही, त्याने आपल्या दोन साथीदारांकडूनही तिच्यावर बलात्कार घडवला. यानंतर तिघांनीही 24 सप्टेंबरपर्यंत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तरुणी कशीबशी त्यांच्या तावडीतून निसटून घरी पोहोचली आणि वडिलांना पूर्ण घटना सांगितली.
वडिलांच्या तक्रारीवरून रघुनाथनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम 366, 376 व 394 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे.
एटीएम लुटून खरेदी केली बाइक, पैसेही वाटून घेतले
बलात्कारानंतर तिघांनीही तरुणीचे एटीएम लुटून त्यातून 63 हजार 468 रुपये काढले. या पैशांतून बाइक खरेदी करून आणखी 30 हजार काढून आपसात वाटून घेतले.

नराधमांनी पीडितेचे ATM ही लुटले, त्या पैशांतून खरेदी केली बाइक

  • young Girl Molested By Boyfriend With 2 Other In Chhattisgarh

Post a comment

 
Top