0
 • जयपूर - राजस्थानच्या श्रीगंगानगर शहरात एका विवाहित तरुणीचा मृतदेह शनिवारी संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. संबंधित महिला गेल्या दोन वर्षांपासून आपल्या पती आणि दोन मुलांना सोडून बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. परंतु, परिस्थिती पाहता गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असावी असे वाटत नाही. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून यासंदर्भात सविस्तर चौकशी केली जात आहे.


  24 तास नातेवाइकांची वाट पाहत होते पोलिस
  पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास या महिलेचा मृतदेह फासावरून काढून रुग्णालय आणि त्यानंतर शवागारात पाठवून दिला. घटनास्थळावरूनच पोलिसांनी तिच्या नातेवाइकांना फोन करून यासंदर्भातील माहिती दिली होती. परंतु, या घटनेच्या 24 तासानंतर दुसऱ्या दिवशी तिचा एक भाऊ रुग्णालयात गेला. तोपर्यंत तिच्यावर शवविच्छेदन सुद्धा करता आले नाही. भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. संबंधित महिलेचे नाव सीमा असून 12 वर्षांपूर्वी तिचा विवाह महावीर नावाच्या एका व्यक्तीसोबत झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाले. तरीही रोजच्या वादाला दोघे कंटाळले. या दरम्यान सीमाचे साहिल नावाच्या एका युवकासोबत अफेअर झाले. तिने दोन वर्षांपूर्वी घर सोडून त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरुवात केली.

  भास्करच्या चौकशीत समोर आले असे काही...
  दैनिक भास्करच्या टीमने तिचे घरमालक हेमंत शर्मा यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सीसीटीव्हीचा दाखला देत सांगितल्याप्रमाणे, सीमा आणि साहिल शुक्रवारी आपल्या खोलीतून काही सामान घेऊन गेले होते. यानंतर त्याच दिवशी रात्री 9:50 वाजता सीमाला घरी सोडण्यासाठी एक युवक आला आणि निघून गेला. यानंतर 10:15 वाजता एक तरुण आणि तरुणी बाइकने घरी आले. ते दोघेही 10:30 वाजता निघून गेले. यानंतर रात्री 11 च्या सुमारास एका युवकासोबत घरी आला. त्याने आधी युवकाला बाहेर थांबण्यास सांगितले. यानंतर 5 मिनिटांतच घराबाहेर येऊन साहिलने त्याला जाण्यास सांगितले आणि पुन्हा वर गेला.

  सीमाचे तिसऱ्या युवकासोबत होते अफेअर?
  घटनास्थळी जाऊन तपास करणारे पोलिस अधिकारी पुरोहित यांनी सांगितल्याप्रमाणे, साहिलला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली आहे. त्यामध्ये सीमा आणखी एका तिसऱ्याच युवकाच्या संपर्कात होती. तासंतास दोघांमध्ये चॅटिंग आणि फोनवर चर्चा व्हायची असा आरोप त्याने केला. यावरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. सीमाने साहिलला सोडण्याचा निर्णय घेतला होता असे साहिलने म्हटले आहे.

  घरमालकाने रुम रिकामी करण्यास सांगितले होते...
  - साहिल आणि सीमा 15 दिवसांपूर्वीच हेमंत कुमार शर्मा यांच्या घरी एक रुम भाड्याने घेऊन राहायला गेले होते. परंतु, त्या दोघांमध्ये होणाऱ्या रोजच्या भांडणांना कंटाळून घरमालकाने त्यांना रूम रिकामी करण्यास सांगितले होते. त्यामुळे शुक्रवारी साहिल आणि सीमा काही सामान घेऊन गेलेही होते. परंतु, रुम सोडली नाही. यानंतर रात्री ती खोली बंद झाली. 
  - दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी घरमालकांनी आपल्या मुलाला छतावरील टाक्यांमध्ये पाणी भरण्यास सांगितले. त्याने नकार दिला असता घरमालकाने साहिलच्या घरी हाक दिली. कित्येक वेळा आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा लोक गोळा झाले. लोकांनी व्हेंटिलेशनमधून डोकावून पाहिले तेव्हा सीमाचा मृतदेह फासाला लटकला होता
  mother of two staying in live in relationship found dead after karwa chauth

Post a Comment

 
Top