0

पोलिसांनी सापळा रचून छापेमारी केली असता आलिम खानच्या घरातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.19 swords seized in Aurangabad

  • औरंगाबाद- हर्सुलमधील जहाँगीर कॉलनीत पोलिसांनी छापेमारी करून तब्बल 19 तलवारी जप्त केल्या आहेत. आलिम खान रहीम खान पठाण (वय- 35) यांच्यासह एकूण 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आलिम खान याने या तलवारी शहरात विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली आहे.

    पोलिस निरीक्षक मधुकर सांवत यांनी सांगितले की, गुन्हेशाखेकडे जहाँगीर कॉलनीत आरोप आलिम खान याने प्राणघात शस्त्र, तलवार विनापरवाना विक्रीसाठी आणल्याची गोपनिय माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून छापेमारी केली असता आलिम खानच्या घरातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. त्याची कसून चौकशी केली असता पोलिसांनी शेख मोहसीन शेख मतीन याच्या घरातून 4, नफीस शरीफ शहा यांच्याकडून 3, इलीयास उर्फ ईलु इसाक कुरेशी शेख इकबाल याच्याकडून 1, शेख परवेज शेख महेराज याच्याकडून 1, शेख आमेर शेख इकबाल याच्याकडून 1, शेख कलीम उर्फ इलीयाज शेख याच्याकडून 1, शेख समीर शेख मोहम्मद अय्युब याच्याकडून 1, शेख असर याच्याकडून 1, शेख आवेज शेख मेहराज 1, अशा एकूण 19 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहे. या प्रकरणी हर्सुल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिस आयुक्त चिरंजीवी प्रसाद, पोलिस उपायुक्त दिपाली धाटे-घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, अफसर शहा, विकास माताडे, विकास वाघ, संजय जाधव, शिवाजी भोसले, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, संजीवनी शिंदे यांनी ही कारवाई केली.

Post a comment

 
Top