जकार्ता - इंडोनेशियात 189 जणांना घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले आहे. या अपघातात कुणीही जिवंत वाचल्याची चिन्हे नाहीत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लायन एअरचे विमान जकार्ता येथून पांकल पिनांग शहराच्या दिशेने सोमवारी सकाळी निघाले होते. परंतु, अवघ्या 13 मिनिटांतच विमानाचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. यानंतर विमान क्रॅश झाल्याचे वृत्त मिळाले. या विमानात 181 प्रवाशांसह क्रू मेंबर्स, पायलट असे एकूण 189 जण प्रवास करत होते. सोबत त्यामध्ये इंडोनेशियाच्या 20 अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता.
इंडोनेशियातील सर्वात मोठा विमान अपघात
हा विमान अपघात इंडोनेशियातील सर्वात मोठा प्लेन क्रॅश मानला जात आहे. यापूर्वी 2014 मध्ये एअर एशियाचे विमान क्यूझेड 8501 क्रॅश झाले होते. त्यामध्ये 162 जणांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त विमान बोइंग 737 मॅक्स-8 होते. या विमानाची एकूण प्रवासी क्षमता 210 आहे. दरम्यान, सोमवारच्या अपघाताचे कारण अद्याप समोर आले नाही. तरीही हे विमान सुद्धा बोइंग 737 मॅक्स-8 असल्याचे म्हटले जात आहे.
Post a Comment