0
 • Tharoor Shashi has criticized Modigनवी दिल्ली - आपल्या वक्तव्यांमुळे सतत वाद पेटवणारे आणि चर्चेत राहणारे काँग्रेस खासदार शशी थरूर रविवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करून वादात अडकले आहेत. बंगळुरू लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रा. स्व. संघाच्या सूत्रांचा हवालात देत थरूर यांनी मोदींची तुलना शिवलिंगावर बसलेल्या विंचवाशी केली. ते म्हणाले, ‘संघाच्या एका व्यक्तीने पत्रकारांशी बोलताना विचित्र तुलना केली होती. ती व्यक्ती म्हणाली होती, मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत. याला आपण हाताने काढू शकत नाही आणि चपलेने मारूही शकत नाही.’
  थरूर यांच्या या टिप्पणीवर आक्षेप घेत भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल स्वत:ला शिवभक्त असल्याचे सांगतात.
  मात्र, त्यांचे नेते भगवान शिवाचा अपमान करतात. हिंदू देव-देवतांचा असा अवमान देश सहन करणार नाही. हा प्रकार राहुल व काँग्रेसला आलेले नैराश्यच दर्शवते, असेही प्रसाद म्हणाले. थरूर यांचे सोनिया व राहुल समर्थन करतात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, यावर स्पष्टीकरण देताना थरूर यांनी ही टिप्पणी सहा वर्षांपूर्वीच्या एका पब्लिक डोमेनमध्ये असल्याचे सांगत सहा वर्षांपूर्वीच्या गोष्टींवरून भाजप वाद पेटवत असल्याचे म्हटले आहे.
  ‘कारवां’तील मोदींसंबंधी लेखात आला होता संदर्भ
  आपल्या टिप्पणीवरून वाद पेटल्याचे लक्षात येताच थरूर यांनी ज्या लेखात हा संदर्भ होता त्याची लिंक ट्विटरवर शेअर केली. विनोद के. जोस यांचा हा लेख असून ‘कारवां’च्या वेबसाईटवर १ मार्च २०१२ रोजी लेख प्रसिद्ध झाला होता. ‘द एम्परर अनक्राऊन्ड’ मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या दीर्घ लेखात शेवटच्या परिच्छेदात म्हटले आहे की, ‘मी गुजरात सोडण्यापूर्वी एका संघाच्या नेत्याने अत्यंत तिरस्काराने म्हटले होते की, शिवलिंगावर विंचू बसला आहे. तो हाताने काढता येत नाही, ना चप्पलने मारता येत नाही.’ जोस या नियतकालिकाचे संपादक आहेत.
  थरूर पाकमध्ये असते तर...
  हा हिंदुस्थान आहे. पाकिस्तान असता तर शशी थरूर यांचे तोंड काय
 • चे बंद केले गेले असते. त्यांनी केवळ पंतप्रधानांचा अपमान केलेला नाही., कोट्यवधी हिंदू आणि भगवान शिवाचा अपमान केला आहे. काँग्रेस आता मर्यादा ओलांडत आहे, एवढेच मी म्हणेन.
  - गिरिराज सिंह, केंद्रीय मंत्र     

Post a Comment

 
Top